Biodata Maker marathi
✕

करिअर टिप्स :आहार तज्ज्ञ म्हणून करिअर बनवा

Updated: शनिवार, 3 जुलै 2021 (17:24 IST)
 
एकेकाळी हे फक्त महिला आणि मुलींचे क्षेत्र मानले जात असे, परंतु आता पुरुषदेखील या कारकीर्दीत रस घेत आहेत.या दिवसात सर्वांचा कल फिटनेस सेंटर, हेल्थ क्लब आणि स्पाकडे वाढला आहे. या केंद्रांमधील आहारतज्ञांना फिटनेसची पातळी कायम राखण्यासाठी आहार सल्ला देण्यासाठी नियुक्त केले जाते.
 
सरकारी संस्था मध्ये संधी-
 
आहारतज्ज्ञांसाठी अशा सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे दरवाजे नेहमीच उघडे असतात.जे संतुलित आहार आणि कुपोषणांवर कार्यरत असतात.रुग्णालये आणि क्लिनिक व्यतिरिक्त, आहारतज्ञ संरक्षण संस्था, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे आणि कंपन्या किंवा कारखान्यांमध्ये चालणार्‍या मोठ्या कॅन्टीनमध्ये काम करू शकतात.
 
तिथे त्यांना एका निश्चित बजेटमध्ये चविष्ट,पौष्टीक,आणि संतुलित आहार कसे तयार करतात ही माहिती पुरवावी लागते.फिटनेस सेंटर मध्ये देखील आहार तज्ज्ञाची मोठी गरज असते.जेथे  फिट राहण्याचे इच्छुक असलेले खेळाडू, मॉडेल्स जातात.
 
 
फ्रिलान्सर रायटर -
 
एक आहार तज्ज्ञ फ्रिलान्सर किंवा लेखक म्हणून देखील रोजगार मिळवू शकतात.आपल्याकडे लिखाणाचे कौशल्य असल्यास आपण या विषयावर पुस्तक देखील लिहू शकता.एखाद्या वर्तमानपत्रात कॉलम लिहू शकता.किंवा पौष्टीक खाद्यपदार्थांची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियावर देऊ शकता.
 
वेतनमान -
 
सध्याच्या काळातआहारतज्ज्ञांना चांगला पगार मिळत आहे.हेल्थ क्लब किंवा स्पा सेंटरमध्ये अर्धवेळ काम करून दरमहा दहा ते 25 हजार रुपये पर्यंत मिळू शकतात.मोठ्या हॉस्पिटल व नर्सिंग होममध्येही दरमहा 25 हजार रुपये पासून सुरू होतात.आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास आपण इच्छित मोबदला मिळवू शकता.
 
संशोधन पर्याय -
 
या क्षेत्रात इतर पर्याय संशोधन कार्य देखील आहे.एक शिक्षक म्हणून देखील कार्य केले जाऊ शकते. आहारशास्त्रज्ञ अशा उद्योगांमध्ये देखील कार्यरत आहेत जे मोठ्या प्रमाणात डबाबंद केलेले पदार्थ तयार करतात आणि त्यावर प्रक्रिया करतात.
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Oats Foot Scrub फक्त २० रुपयांच्या ओट्सने १० मिनिटांत पायांचा थकवा चुटकीसरशी होईल दूर

हिवाळ्यात बाजरी खाण्याची सवय लावा; वजन कमी होण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत मिळतील अनेक फायदे!

सर्व वयोगटातील महिलांसाठी ही ३ योगासने सर्वोत्तम; दररोज फक्त १० मिनिटे करा

रेशमी, लोकरी आणि काश्मिरी कपड्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या घरगुती टिप्स फॉलो करा!

तेनालीरामाची कहाणी : एक भाकरी, शंभर लढाया

पुढील लेख
Show comments