CS Exam चे परीक्षांचे वेळापत्रक जारी
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाने फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल अर्थातच सीएस परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जून २०२१ मध्ये या परीक्षा होणार आहेत.
सीएस फाउंडेशन परिक्षा ५, ६ जून रोजी आणि कंपनी सेक्रेटरी परीक्षा १ ते १० जून या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. जून ११ ते १४ हे दिवस आपत्कालिन म्हणून राखून ठेवल्याचेही ICSI ने परिपत्रकात म्हटले आहे.
डिसेंबरमध्ये परीक्षा देऊ शकले नाही असे विद्यार्थी जून मध्ये परीक्षा देऊ शकतील. ऑप्ट आऊट फॉर्म सबमीट करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२१ पर्यंत आहे.
डिसेंबरमध्ये होणारी सीएस परीक्षा या महिन्याच्या २१ ते ३० तारखेदरम्यान होणार आहे. देशभरात २६२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे पालन तसेच विद्यार्थ्यांनी मास्क, सॅनिटायझर्सचा वापर करणं अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी अॅडमिट कार्डही जारी करण्यात आलं आहे.
डिसेंबर सीएस परीक्षेचं अॅडमिट कार्ड जाहीर केले गेले आहे तसेच संस्थेच्या icsi.edu या अधिकृत संकेतस्थळावर रेफरन्स स्टडी मटेरियल देखील उपलब्ध आहे.