गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : बुधवार, 8 जून 2022 (00:18 IST)

12 वी नंतर काय करावे ?Career options after class 12th

What to do After 12th : जोपर्यंत विद्यार्थी दहावीत शिकतो तोपर्यंत त्याला सर्व विषय अनिवार्य असतात, म्हणजेच त्याला सर्व विषयांचा अभ्यास शाळेनुसार करावा लागतो. पण जेव्हा विद्यार्थी अकरावीच्या वर्गात जातात तेव्हा ते त्यांच्या आवडीचा प्रवाह निवडतात. दहावीत चांगले गुण मिळवणारे बहुतांश विद्यार्थी विज्ञान शाखेची निवड करतात. विज्ञान, वाणिज्य, कला असे तीन प्रवाह आहेत. बारावीची परीक्षा संपली की बारावी नंतर काय करावं आणि काय करू नये , विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होतात तेव्हा त्यांना वाटतं की 12वी नंतर काय करायचं म्हणजे 12वी नंतर आपल्या चांगल्या करिअरसाठी काय करायचं. हेच मुलांच्या मनात असतं.
जे विद्यार्थी वकील, एचएम, पॉलिटिक्सला त्यांच्या निश्चित भविष्य म्हणून बघतात, ते कला शाखेची निवड करतात.
 
दहावीत चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी विज्ञान शाखेची निवड करतात. जेणेकरून तो वैद्यकिय क्षेत्रात पुढे जाऊ शकतील किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ शकतील. 
 
बारावी सायन्स नंतर काय करायचं?
विज्ञान शाखेत विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय असतात किंवा कोणतेही जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषय घेतात. किंवा जीवशास्त्र व गणित हे दोन्ही विषय घेऊ शकतात .
 
12वी नंतर B.Sc -
विज्ञान शाखेचे विद्यार्थी ग्रॅज्युएशनमध्ये B.Sc करू शकतात. यामध्ये गणित , रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र या विषयात बीएससी करू शकतात. यानंतर विद्यार्थी पदव्युत्तर पदवी M.Sc देखील करू शकतात . यापैकी कोणताही एक विषय निवडून विद्यार्थी पदवी मिळवू शकतात.
 
रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकीमध्ये आपले भविष्य घडवू शकतात तसेच आयआयटी आणि जेईई परीक्षेची तयारी करू शकतात. जर तुम्हाला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे नसेल तर ते B.Sc, BA, ग्रॅज्युएशन आणि हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकतात. 
 
2 बारावी नंतर एन.डी.ए-
जर तुम्हाला डिफेन्समध्ये जायचे असेल तर तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्समधील कोणतेही एक विभाग निवडून सरकारी नोकरी मिळवू शकता . यासाठी तुम्ही आधी एनडीएची तयारी करू शकता.
 
3 12वी कॉमर्स नंतर -
वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेली मुले पदवीमध्ये बी.कॉम करू शकतात . तसेच तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्ही बँकेत अकाउंटिंगची तयारी करू शकता. मात्र यासाठी तुमची पदवीही असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोर्स करायचा असेल तर तुम्ही B.BA, B.CA, B.MS इत्यादी कोर्स करू शकता.
 
4 12वी कला नंतर-
कला शाखेत बारावी उत्तीर्ण केल्यावर अनेक अभ्यासक्रम आहेत. आणि सरकारी नोकऱ्यांनाही वाव आहे. तुम्ही नागरी सेवा परीक्षेबद्दल ऐकले असेलच, तुम्ही नागरी सेवा परीक्षेची तयारी देखील करू शकता.राजकारणाच्या क्षेत्रात यायचे असेल तर तुम्ही वकील होऊ शकता. तसेच मार्केटिंगसाठी एमबीए करू शकता.
 
5 12वी नंतर काही इतर कोर्सेस-
बारावीनंतर तुम्ही डिप्लोमा, व्होकेशनल कोर्स, प्रोफेशनल कोर्स करू शकता .असे काही करू शकता.जे केल्याने भरपूर पैसे मिळतील. 
 
 6 मास कम्युनिकेशन -
जर तुम्हाला रिपोर्टर व्हायचे असेल तर तुम्ही मास कम्युनिकेशन कोर्स करू शकता. ज्यामध्ये तुम्ही आनंदही घेऊ शकता, तुम्हाला इकडे-तिकडे फिरण्याची संधीही मिळेल. आणि तुम्हाला चांगला पगारही मिळेल. पत्रकारिता, वृत्तवाहिनीमध्ये नोकरी मिळू शकते. आणि तुम्ही तुमचे भविष्य व्हिडिओग्राफर, अँकर, रिपोर्टर बनवू शकता.
 
7 टुरिझम कोर्स -
जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि तुम्हाला नवीन ठिकाणांबद्दल जाणून घेण्याची खूप आवड असेल तर तुम्ही पर्यटनाचा कोर्स करू शकता. त्यामुळे पर्यटनाचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये तुम्ही भटकंती करू  शकता आणि त्याचबरोबर भरपूर पैसेही कमवू शकता.हा कोर्स करून तुम्ही तुमची स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी उघडू शकता.
 
8 हॉटेल व्यवस्थापन –
आजकाल हॉटेल मॅनेजमेंट कोर्स खूप प्रचलित आहे. जर तुम्हाला स्वयंपाकाची खूप आवड असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, तुम्ही कोणत्याही चांगल्या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकता. आणि एक चांगले शेफ बनू शकता. आणि तुम्ही परदेशात जाऊन शेफची नोकरी देखील करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल आणि तुम्ही पैसेही कमवू शकता.
 
9 12वी नंतर कृषी अभ्यासक्रम-
भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्राला भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर ओळखले जाते .विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातही करिअर करता येईल. कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृषी अभ्यासक्रम चालवले जातात. तुम्हालाही शेतीची आवड असेल, तर तुम्ही कृषी अभियंता, डेअरी इंजिनीअरचा कोर्स करू शकता. आणि या क्षेत्रात नौकरी मिळवू शकता. 
* पीक तज्ञ
* खत विक्री प्रतिनिधी
* अन्न सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
* अन्न संशोधक
* वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ
* माती सर्वेक्षणकर्ता
* शेती व्यवस्थापक
* कृषी अभियंता
* कृषी संशोधक
 
10 12वी नंतर भाषा अभ्यासक्रम -
12वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला नवीन भाषा शिकण्याची किंवा बोलण्याची खूप आवड असेल, तर तुमच्यासाठी भाषा अभ्यासक्रम सर्वोत्तम असेल. या कोर्समधून तुम्हाला नवीन भाषा शिकायला मिळेल आणि तुम्हाला परदेशात नोकरीची संधी मिळेल आणि तुम्ही भाषा अभ्यासक्रमांतर्गत सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता. आणि टूरिझम गाईडलाईनमधील भाषा कोर्स करून चांगले पैसे कमवू शकता.
 
11 12 वी नंतर इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स-
पार्टी करण्याची खूप आवड असेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करून चांगले पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळेल आणि चांगली नोकरी मिळू शकते.
 
12 12वी नंतर अॅनिमेशन कोर्स-
आजकाल कार्टून फिल्म्स बनतात, त्यात अॅनिमेशनचा वापर केला जातो.अॅनिमेशन कोर्स करून तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता.