रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: पंढरपूर , गुरूवार, 2 एप्रिल 2020 (14:07 IST)

आषाढी वारीची नियोजन बैठक रद्द

आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी चैत्र शुध्द दशमीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणारी वारकरी फडकरी दिंडी समाजाची बैठक रद्द करण्यात आली असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कोकाटे यांनी दिली.

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीचे नियोजन करण्यासंदर्भात चैत्र शुध्द दशमी म्हणजे शुक्रवार, 3 रोजी पंढरीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मठात बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु सध्या जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून गावोगावच्या जत्रा, यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मंदिरेही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर लॉकडाउन लागू केले आहे. अशा परिस्थितीत देशावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करणे गरजेचे आहे.

यासाठी वारकरी संप्रदायाने हा निर्ण जाहीर केला आहे. दरम्यान, चैत्री वारीला राज्यभरातून सुमारे 3 ते 4 लाख वारकरी पंढरपूरला येतात. हे सर्वजण एकत्र आल्याने कोरोना हा संसर्गजन्य रोग सर्वत्र पसरण्याची भीती आहे. त्यामुळे हीमहामारी आटोक्यात येण्याऐवजी त्याचा प्रसार होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे यंदाच्या चैत्री वारीलाही वारकरी, फडकरी समाजाने येऊ नये असे आवाहनही कोकाटे हाराज यांनी केले आहे.

तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची चैत्री यात्रा रद्द केल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.