Daily Horoscope
✕

कोरोना : कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नाही

Updated: शनिवार, 8 मे 2021 (20:02 IST)
 
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याबाबतचं राष्ट्रीय धोरण काय आहे आपण पाहूयात.
 
संशयित रुग्णांना गरजेप्रमाणे कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड हेल्थ सेंटर आणि कोव्हिड रुग्णालयात संशयित वॅार्डमध्ये दाखल केलं जावं.
कोव्हिड रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॅाझिटिव्ह रिपोर्ट सक्तीचा नाही.
कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला उपचार नाकारले जाऊ नयेत, रुग्ण दुसऱ्या शहरातला असला तरी त्याला उपचार आणि औषधं द्यावीत, ऑक्सिजनची गरज असल्यास तो देखील पुरवण्यात यावा.
ज्या शहरात रुग्णालय आहे त्या विभागातील कायदेशीर मान्यता असलेलं ओळखपत्र रुग्णाकडे नसलं तरी त्याला दाखल करून घेऊन उपचार द्यावेत.
रुग्णालयात दाखल होण्याची गरज नसलेल्यांना बेड्स देण्यात येऊ नयेत. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नसलेल्या व्यक्ती बेड्स अडवून ठेवणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
नवीन डिस्चार्च पॉलिसीच्या आधारे रुग्णांना हॉस्पिटलमधून रजा देण्यात यावी.
डॉक्टरांकडून धोरणांचं स्वागत
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या या धोरणांचं डॉक्टर्सनी स्वागत केलंय.
 
याविषयी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणाले, "या मार्गदर्शक सूचनांना भले खूप उशीर झाला असेल पण याचं स्वागत करतो. ज्या रुग्णांना लक्षणं आहेत, पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. अशांना याचा नक्की फायदा होईल.
 
"हे रुग्ण सुपर स्प्रेडर बनणार नाहीत. त्याचसोबत एका शहरातून दुसऱ्या शहरात उपचारासाठी जाणाऱ्यांना मदत मिळेल. बऱ्याच रुग्णांना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह येतो. आता हे रुग्ण कोव्हिड सेंटरमध्ये संशयित म्हणून दाखल होऊ शकतात."

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

७६ लाख वाढीव मतदारांचा मुद्दा पुन्हा तापणार; प्रकाश आंबेडकर २८ ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करणार !

"उपमहापौर, तुम्हाला ठार मारेन"! शिवसेना नेत्याला धमकी; पोलिसांनी गुन्हा दाखल केला

"आई, तू कधी येणार?", चिमुकल्याच्या प्रश्नाने सर्वांना अश्रू अनावर; वकील महिलेचा ट्रेलरखाली चिरडून मृत्यू

रॅपिडो रायडर असल्याचे भासवून दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या संशयिताला एटीएसने पकडले

मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली

पुढील लेख
Show comments