दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
राजधानी दिल्लीत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 461 नवीन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याची सूचना केली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णसंख्या वाढल्याची 20 फेब्रुवारीनंतरची ही सर्वाधिक संख्या आहे. 20 फेब्रुवारी रोजी 570 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तसंच दिल्लीत कोरोना संसर्गाचा दर 5.33 टक्क्यांवर पोहचला आहे.
दिल्लीत सध्या 1262 सक्रिय रुग्ण आहेत. 5 मार्चनंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत देशभरात 975 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसंच मुंबईत शनिवारी (16 एप्रिल) 43 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोना आकड्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार पहायला मिळत आहेत.