मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (19:51 IST)

भारतात कोविड-19 चे 975 नवीन रुग्ण आढळले, चार संक्रमितांचा मृत्यू

भारतात एका दिवसात कोविड-19 चे 975 नवीन रुग्ण आढळून आल्याने, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,30,40,947 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
 
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11,366 झाली आहे.
 
आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजता अद्यतनित केलेल्या आकडेवारीनुसार, आणखी चार संक्रमितांचा मृत्यू झाल्याने साथीच्या आजारामुळे मृतांची संख्या 5,21,747 वर पोहोचली आहे.
 
मंत्रालयाने म्हटले आहे की देशात उपचाराधीन रूग्णांची संख्या एकूण प्रकरणांपैकी केवळ 0.03 टक्के आहे, तर संसर्गमुक्त राष्ट्रीय दर 98.76 टक्के आहे.
 
आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 175 ने वाढ झाली आहे.
 
मंत्रालयाने सांगितले की, देशातील दैनिक संसर्ग दर 0.32 टक्के आहे, तर साप्ताहिक संसर्ग दर 0.26 टक्के नोंदवला गेला आहे.
 
आकडेवारीनुसार, बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,25,07,834 झाली आहे, तर संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे.