शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (17:08 IST)

पुढील 15 वर्षात अखंड हिंदुस्तान होईल : मोहन भागवत

पुढील 15 वर्षात अखंड हिंदुस्तान होईल आणि आपल्या सर्वंना तो पहायला मिळेल असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत  यांनी केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपण अहिंसेबद्दल बोलू, पण हातात दंडूका घेऊन बोलू. आपल्या मनात कसलाही द्वेष किंवा वैर नाही, पण जग शक्तीला मानत असेल तर काय करणार? असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 
 
संत आणि ज्योतिषांच्या मते 20 ते 25 वर्षात भारत अखंड राष्ट्र होईल, पण आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर 10 ते 15 वर्षातच भारत अखंड राष्ट्र होईल असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 
 
सनातन धर्माला विरोध करणाऱ्या तथाकथित लोकांचंही यात सहकार्य आहे, त्यांनी विरोध केला नसता तर हिंदू जागा झाला नसता, भारताचा उदय झाला तर तो धर्मानेच होईल, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.