ganesh chaturthi

कोरोना उपचार : कोरोनापासून वाचवणाऱ्या आणखी एका उपचार पद्धतीचा शोध

Updated: शनिवार, 19 जून 2021 (21:36 IST)
रुग्णालयात दाखल असलेल्या तीनपैकी एका रुग्णासाठी हे उपचार उपयुक्त ठरू शकतात, असे निष्कर्ष समोर आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अतिगंभीर शंभर रुग्णांपैकी किमान 6 रुग्णांचे प्राण हे औषध वाचवू शकतं.
 
कुणाला होईल उपयोग?
कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी ज्या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी बनल्याच नाहीत, अशा रुग्णांसाठी हे उपचार उपयोगी आहेत.याची किंमत 1 ते 2 हजार डॉलरच्या दरम्यान असेल, अशी माहिती मिळाली आहे.
किंबरले फिदरस्टोन (वय 37) या एका रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत होत्या. त्यांच्यावर या उपचार पद्धतीची चाचणी करण्यात आली.त्या सांगतात, माझ्यावर याची चाचणी घेण्यात आली, याबाबत मी स्वतःला खूप नशीबवान समजते. मी रुग्णालयात दाखल होते. पुढे काय होईल, मला कल्पना नव्हती. पण मला या उपचारांचा चांगला उपयोग झाला.या चाचणीत भाग घ्यायला मला आवडलं. हे उपचार उपयुक्त ठरल्याचं कळल्यानंतर मला खूप आनंद झाला, असं त्या म्हणाल्या.मोनोक्लोनल अँटिबॉडी ट्रिटमेंट ही रेजनरॉन यांच्याकडून बनवण्यात आली आहे.त्यामध्ये व्हायरसला इतर पेशींना संसर्ग करण्यापासून तसंच त्यांचे आणखी बाधित पेशी बनवण्यापासून रोखलं जातं.या चाचणीत युकेतील सुमारे 10 हजार कोरोना रुग्ण सहभागी झाले होते.
 
त्यातील निष्कर्षानुसार, या उपचारांमुळे
 
- मृत्यूचा धोका कमी झाला.
 
- रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची गरजही चार दिवसांनी कमी झाली.
 
- व्हेंटीलेटर किंवा श्वास घेण्यात अडथळे निर्माण होण्याचं प्रमाणही कमी झाल्याचं आढळून आलं.
 
संयुक्त मुख्य संशोधक सर मार्टिन लँड्रे सांगतात, "दोन अँटीबॉडीचं कॉम्बिनेशन असलेली ही उपचार पद्धत रुग्णांना दिल्यानंतर मृत्यूचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो."
 
उपचारातील अनिश्चितता
हे उपचार सूजरोधक स्टेरॉईट औषध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्सामेथेसॉनसोबत दिले जातात. डेक्सामेथेसॉनही गंभीर रुग्णांवर अत्यंत उपयुक्त आहे.
संशोधनातील आणखी एक मुख्य संशोधक सर पीटर हॉर्बी यांच्या मते, अँटीबॉडी थेरपी फायदेशीर आहे की नाही, याबाबत अनेक अनिश्चितता आहेत.काही अभ्यासांमध्ये त्यांचा काहीही उपयोग होत असल्याचंही दिसून आलं आहे.
 
उदाहरणार्थ, सुरुवातीला ब्लड प्लाझ्मा थेरपीही वापरली जात होती. ही थेरपी एक अँटीबॉडीयुक्त उपचार पद्धतच आहे. पण ही उपचार पद्धत पुढे प्रभावी असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही.
 
मात्र, यावेळी वापरण्यात आलेल्या उपचार पद्धतीत लॅबमध्ये बनवण्यात आलेल्या दोन विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडींचा वापर करण्यात आला आहे. त्यामध्ये या व्हायरसचा खात्मा करण्यासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.
स्वतः अँटीबॉडी निर्माण करण्यात अयशस्वी ठरणाऱ्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धत वरदान ठरू शकते. त्यामुळे मृत्यूदरही कमी होईल. त्याचे पूर्ण परिणाम दिसण्यासाठी आणखी काही वेळ थांबावं लागू शकतं.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख