शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (21:24 IST)

Mucormycosis: मुंबईत कोरोनापासून बरं झालेल्या मुलांमध्ये ब्लॅक फंगस आढळले,3 मुलांचे डोळे काढावे लागले

मुबंईत ब्लॅक फंगस ला बळी पडलेल्या तीन मुलांचे डोळे काढावे लागले,तिन्ही मुलं कोरोना बाधित झाले होते परंतु ते त्यातून बरे सुद्धा झाले होते.नंतर ते ब्लॅक फंगसला बळी ठरले.
 
कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागात ब्लॅक फंगस चे प्रकरण वाढून काळजीत टाकत आहे.या मुळे मुबंईत ब्लॅक फंगसला 3 मुलं बळी पडल्याने त्यांचे डोळे काढावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही मुलं कोरोनाने बरे झाले होते नंतर ते दुर्देवाने ब्लॅक फंगसला बळी पडले. 
 
मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये या तीन मुलांचे वय 4, 6 आणि 14 वर्षे आहे. डॉक्टरांच्या मते, 4 आणि 6 वर्षाच्या मुलांमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे नाहीत, तर 14 वर्षांच्या मुलांनाही. या व्यतिरिक्त एक 16 वर्षाची मुलगी देखील आहे, जी कोरोनातून बरे झाल्यानंतर मधुमेहाची शिकार झाली, मुलीच्या पोटात ब्लॅक फंगस आढळली.
 
मुंबईतील खासगी रुग्णालयात ब्लॅक फंगसचे 2 प्रकरणें आढळली आहे.दोन्ही मुले अल्पवयीन आहेत. मधुमेहाची शिकार झालेल्या 14 वर्षांच्या मुलीची प्रकृती ठीक नव्हती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 48 तासांच्या आत, मुलीमध्ये ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आली.
 
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ,मुलीचे डोळे काढावे लागले त्यानंतर जवळपास 6 आठवड्यांपर्यंत तिची काळजी घेण्यात आली. सुदैवाने, संसर्ग तिच्या मेंदूत पोहोचला नाही, परंतु तिने तिचा डोळा गमावला.
 
16 वर्षांच्या मुलीला मधुमेहाची लक्षणे आधीपासूनच नव्हती, परंतु कोरोनापासून बरे झाल्यानंतर तिला काही समस्यांचा सामना करावा लागला. ब्लॅक फंगस तिच्या पोटात  पोहोचला होता, परंतु नंतर ती  बरी  झाली.त्याच वेळी, 4 आणि 6 वर्षाच्या मुलांवर दुसर्‍या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार जर मुलांचे डोळे काढले नसते तर त्यांचे प्राण वाचवणे फारच अवघड झाले असते.
 
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध भागात ब्लॅक फंगसची हजारो प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत जेव्हा रूग्णांचे  ब्लॅक फंगस मुळे डोळे किंवा नाक काढून घ्यावे लागले किंवा त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम झाला .