शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 20 जुलै 2020 (07:57 IST)

वाचा, डासांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो का?

पावसाळ्याच्या दिवसांत डासांमुळे डेग्यू, मलेरियासांरख्या आजारांचा धोका वाढतो. अशात अनेक लोकांमध्ये डासांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो का? अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी माहिती देत, डासांमुळे कोरोना संसर्ग होत नसल्याचं सांगितलं आहे. 
 
अमेरिकेतील कॅनसास स्टेट युनिव्हर्सिटीमधील  संशोधक स्टीफन हिग्ज यांनी सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेने ठामपणे सांगितलं आहे की, डासांद्वारे विषाणूचा प्रसार होऊ शकत नाही. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार, पहिल्यांदाच हा दावा सिद्ध करण्यासाठी आकडेवारी सादर केली गेली. विद्यापीठाच्या जैविक संवर्धन संशोधन संस्थेमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, व्हायरस डासांच्या तीन सामान्य प्रजातींमध्ये प्रजनन करण्यास असमर्थ आहे आणि त्यामुळे व्हायरस डासांद्वारे माणासांपर्यंत पोहचू शकत नाही. 
 
शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्या कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावला, तरी त्या व्यक्तीच्या रक्तात असलेले कोरोना विषाणू डासांच्या आत जगू शकत नाही, म्हणूनच डास दुसर्‍या व्यक्तीला चावल्यास त्याला संसर्ग होण्याचा धोका नसतो.