1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 19 जुलै 2020 (17:42 IST)

मुंबईत तेरा वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या!

mumbai murder
मुंबईतील मालवणी भागात १३ वर्षाच्या मुलाची शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाने गळा चिरून हत्या केली आहे. याच परिसरातील निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला. या हत्येप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली.

विद्यानंद यादव (वय १३) असं मृताचं नाव आहे. आरोपी करण बहादूर (वय २३) हा शेजारीच राहतो. तो रिक्षाचालक आहे. यादव कुटुंबीय आणि बहादूर याचं छोटीशी भिंत बांधण्यावरून वाद झाला होता. यातून हे हत्याकांड घडलं, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी एका १३ वर्षीय मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. या हत्येचा छडा पोलिसांनी लावला असून, शेजारी राहणाऱ्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. लॉकेट, कपडे आणि चपलांवरून मृतदेहाची ओळख पटली आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. बहादूरने विद्यानंदला रिक्षा चालवायला शिकवतो असं सांगून मालवणी परिसरातील निर्जन ठिकाणी नेलं. तिथं त्याचा धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली.