रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 जून 2020 (16:25 IST)

‘टिकटॉक’बघू दिलं नाही; मुलानं केली आत्महत्या

टिकटॉक बघण्यास मनाई केल्याने १७ वर्षीय मुलाने विष प्राशन करून आत्महत्या (suicide case)केली. ही घटना देवलापारमधील सिंदेवानी येथे घडली. गुरुदेव हिरामण भलावी, असे मृताचे नाव आहे.  गुरुदेव हा मोबाइलवर टिकटॉक बघत होता. त्याच्या वडिलांनी गुरुदेवला हटकले. 
 
'मोबाइलवर खेळत जाऊ नको, शेतात जाऊन काम करता जा', असे ते गुरुदेवला म्हणाले. वडील रागावल्याने गुरुदेवने विष प्राशन केले. त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून गुरुदेवला मृत घोषित केले. देवलापार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.