Daily Horoscope
✕

देशातील 10 राज्यांमध्ये जमावबंदी लागू

Updated: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (19:49 IST)
 
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारी रात्रीपासून नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय राज्य सरकारने नोएडा आणि लखनऊमध्ये 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू केले आहे.
 
गुजरात : राज्य सरकारने अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, जामनगर, भावनगर, गांधीनगर आणि जुनागड या शहरांमध्ये 31 डिसेंबरपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. लोकांना मध्यरात्रीपर्यंत होम डिलिव्हरी आणि टेक-अवे सेवांना परवानगी देण्यात आली आहे.
 
राजस्थान : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्यू अजूनही सुरूच आहे. मात्र, राज्यात कोविडची प्रकरणे कमी होत असताना, कडकपणा शिथिल करण्यात आला. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकार पुन्हा एकदा सतर्क झाले आहे.
 
या राज्यांमध्ये ख्रिसमस-नववर्ष सेलिब्रेशनवर बंदी
 
दिल्ली : डीडीएमएच्या आदेशानुसार, पुढील आदेशापर्यंत हॉटेल, बार किंवा रेस्टॉरंटमध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोकांना बसता येणार नाही. राजधानीत ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्ट्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.
 
तामिळनाडू : राज्यातील हॉटेल आणि क्लबमध्ये फक्त लसीकरण झालेल्या लोकांनाच प्रवेश दिला जाईल. नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या उत्सवांवर कोणतेही बंधन नाही.
 
ओडिशा : राज्यात लोक नवीन वर्षाचे सार्वजनिकपणे उत्सव साजरे करू शकणार नाहीत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला बंदी असेल.
 
तेलंगणा : तेलंगणामध्ये आतापर्यंत कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन प्रकाराची 38 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्यातील गडेम नावाच्या गावात ओमायक्रॉन प्रकाराचे प्रकरण समोर आले आहे. यानंतर खबरदारी घेत लोकांनी गावात 10 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे.
 
कर्नाटक : कर्नाटकमध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत नवीन वर्ष साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. लोक कोणत्याही निर्बंधांशिवाय ख्रिसमस साजरा करू शकतात. मात्र चर्चमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

"मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही"; मुंबईत जोडप्यावरील हल्ल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक!

LIVE: पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्यास असलेल्या थायलंडच्या १९ महिलांना अटक

फक्त १० लाखांत ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक SUV! मार्च २०२७ पर्यंत लाँच होण्याची शक्यता

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

आधी सोने न खरेदी करण्याचा सल्ला, आता पंतप्रधान मोदींचा 'बचतीचा' इशारा; २०२७ च्या संकटाचे संकेत?

पुढील लेख
Show comments