शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (11:06 IST)

सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

राज्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून मंगळवारी १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ३७ लाख २४ हजार ९११ नमुन्यांपैकी ७ लाख ०३ हजार ८२३ नमुने पॉझिटिव्ह (१८.८९ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ५३ हजार २७३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६६८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात ३२९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.