महाराष्ट्रात करोनाचा चौथा बळी
राज्यात करोना व्हायरसमुळे चौथा बळी गेल्याची बातमी आहे. या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती 65 वर्षे वयाची होती.
ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णाला दाखल केलं गेलं होतं. होता. ही व्यक्ती युएईतून प्रवास करुन भारतात आली होती. या व्यक्तीस उच्च रक्तदाब आणि अनियंत्रित मधुमेहही होता अशीही माहिती मुंबई महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
करोनाग्रस्तांची महाराष्ट्रातली संख्या 101 वर पोहचली आहे.