शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (17:22 IST)

रेमेडिसिव्हिर वापरण्याच्या इतर मार्गांचा शोध सुरु, इनहेलरवर संशोधन

रेमेडिसिव्हिर औषध कोरोना विषाणूच्या उपचारात सर्वात प्रभावी मानलं जातं. रुग्णांवर त्याचा परिणाम दिसून आल्यानंतर औषध बनवणारी कंपनी गिलियड हे औषध अधिक सहजतेने कसं घेता येईल यावर विचार करीत आहे. कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे. रेमेडिसिव्हिर वापरण्याच्या इतर मार्गांचा शोध घेत आहोत, तसंच यासाठी इनहेलरवर संशोधन केलं जात आहे, असं कंपनीने निवेदनात म्हटलं आहे.
 
वॉल स्ट्रीट या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी मरदाद पारसी यांनी कंपनीच्या योजनांबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आगामी काळात रेमेडिसिव्हिरच्या इंजेक्शनसह पावडर बनवण्याचं संशोधन सुरु आहे, ज्यामुळे ते औषध इनहेलरद्वारे घेता येईल. रेमेडिसिव्हिर गोळीच्या स्वरूपात दिलं जाऊ शकत नाही कारण त्याचे रासायनिक थर यकृताला हानी पोहचवतात. हे औषध फक्त इंट्राव्हेनस (आयव्ही) स्वरूपात रूग्णालयात दिलं जाऊ शकतं. गिलियड रेमेडिसिव्हिरच्या विद्यमान आयव्ही फॉर्म्युलेशनला कसं पातळ केलं जाऊ शकतं आणि नेब्युलायझरद्वारे कसं घेतलं जाऊ शकतं याचा अभ्यास करीत आहे.