Marathi Biodata Maker
✕

अमेरिका, इटलीपेक्षा भारताची स्थिती चांगली

Updated: रविवार, 10 मे 2020 (16:59 IST)
 
अनेक विकसित देशांत जी परिस्थिती दिसते, त्यापेक्षा चांगली स्थिती भारतात आहे, असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांच्या संक्रमणाचा दर दुप्पट होण्यासाठी सध्या 11 दिवसांचा कालावधी लागत आहे. गेल्या सात दिवसांवर नजर टाकली तर हाच दर 9.9 दिवसांचा होता. देशात कोरोना संक्रणामुळे मृत्युमुखी पडणार्यांकचा दर 3.3 टक्के आहे, हा जगातील सर्वात कमी मृत्यू दर आहे. याशिवाय भारतातील रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) 29.9 टक्के आहे, हे सगळे चांगले संकेत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
 
देशात नव्याकोरोना प्रोटोकॉलनुसार, सौम्य कोरोनाचा संसर्ग असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यापूर्वी टेस्टिंगची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत आणि परिस्थिती सामान्य असेल तर त्याला 10 दिवसांत रुग्णालयातून सुटी दिली जाईल. रुग्णालयातून परतल्यानंतर या रुग्णांना 14 दिवसांऐवजी 7 दिवसांपर्यंत होमआसोलेशनमध्ये राहावे लागेल. 14 व्या दिवशी टेली कॉन्फरन्सद्वारे या रुग्णांचा फेरआढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

कल्याणच्या वराप गावात गरब्या दरम्यान तरुणावर तलवारीने हल्ला, ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्री होतील’; दसरा मेळाव्यात शिवसेना मंत्र्याच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण!

आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंनी चार कांस्य पदके जिंकली

LIVE: पंकजा मुंडे यांनी अंतरवाली सराटी गाव दत्तक घेतले

शेफाली वर्माने ५ षटकार मारून हरमनप्रीत कौरचा मोठा विक्रम मोडत इतिहास रचला

पुढील लेख