शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By विकास सिंह|
Last Modified: शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (15:43 IST)

Corona Alert : सायलेंट किलर कोरोनापासून वाचवेल आपलं इम्यून सिस्टम

देशातील कोरोनाचे थैमान वाढतच चालले आहे. कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 18 हजारांच्या पार गेलेली आहे. तसेच या आजारांमुळे बळी गेलेल्यांची संख्या पण 600 च्या वर गेलेली आहे. ह्याच दरम्यान दिलासा देणारी बातमी म्हणजे असे की 3 हजारापेक्षा जास्त लोकं बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा असा दावा आहे की आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेलेल्या 75 टक्के लोकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्तीचे आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशातील एकूण कोरोना संक्रमित प्रकरणांपैकी 47 टक्के लोकांचे वयोगट 40 वर्षा पेक्षा कमी आहे. 
 
या दोन आकडेवारी बघता असे दिसून येते की ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे ते करोनाला मत करून घरी परत येत आहे, तर असे व्यस्कर ज्यांना आधीपासून काही आजार आहे, किंवा वय झाल्यामुळे ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्याने कोरोनाशी लढा देण्यात अपयशी ठरतं आहे. 
 
अश्या परिस्थितीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती बळकट करणे फार महत्त्वाचे आहे. जेणे करून आपल्याला कोरोनाचे संक्रमण होऊ नये. या संपूर्ण प्रकरणावर वेबदुनियाने  भोपाळमधील नर्मदा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेश शर्मा यांच्याशी विशेष संवाद साधले. संभाषणाच्या सुरुवातीस ते म्हणाले की या वेळी संपूर्ण जग कोरोनामुळे त्रस्त आहे, आणि हा असा एक विषाणू आहे ज्याने आज अनेकांचे जीवन ग्रासले आहे. 
 
ते म्हणतात की या क्षणी कोरोना विषाणूंपासून बचाव करण्यासाठी आणि लढा देण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती एकमेव प्रभावी औषध आणि उपाय आहे. 
 
आपल्या शरीराच्या बाहेरील कोणत्याही विषाणू, जिवाणू, जंतू किंवा रोगाविरुद्ध लढण्याच्या क्षमतेस आपली रोग प्रतिकारक शक्ती म्हटले जाते. जसं जसं वय वाढत गेले तसं तसं आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.
 
या व्यतिरिक्त, एखाद्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यास उदाहरणार्थ मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कर्करोगासारख्या कुठल्याही गंभीर आजारामुळे आपलं शरीर कमकुवत होतं. 
ते म्हणतात की हेच कारण आहे की देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या आधीपासून अन्य रोगांनी ग्रस्त असलेल्या किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या लोकांमध्ये जास्त आहे. 
 
ते म्हणतात की या वेळी आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे मजबूत ठेवणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे, जर आपणं धूम्रपान करत असल्यास त्वरित सोडून टाका. जेणे करून आपल्या फुफ्फुसांना कुठल्याही प्रकाराच्या संक्रमण होऊ नये. डॉ. राजेश सांगतात की आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला वाढविण्यासाठी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष्य देणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर पुरेशी झोप देखील घ्यायला हवी. 
 
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी, शासनाने केलेल्या लॉकडाउनमध्ये कुटुंबासमवेत चांगला वेळ घालावा आणि नेहमी आनंदी राहावे आपली दैनंदिनी व्यवस्थित ठेवावी. डॉ. राजेश शर्मा म्हणतात की लॉक डाउनच्या काळात आपल्याला हिरव्या भाज्या मिळत नसल्यास अश्या परिस्थितीत घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा आणि आनंदित राहावे. 
 
अश्या परिस्थितीत ICMR ने आपल्या ताज्या अहवालात एक धक्कादायक खुलासा केला तेव्हा त्यामध्ये आढळून आले की देशामध्ये कोरोना पॉझिटिव्ह मध्ये 100 पैकी 80 प्रकरणे अशी आहे ज्यामध्ये सर्दी खोकला किंवा तापासारखी कोणतेही लक्षणे आढळून आलेली नाही. चिन्हे स्पष्ट आहेत की आता धोका वाढला आहे आणि कोरोना एक मूक हत्यारा (किलर) म्हणून बाहेर येत आहे आणि आपण त्याला आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवून मजबूत करूनच टाळू शकतो.