Dharma Sangrah
✕

मास्‍क ‘ढाल’ आहे, पण चुकीचा वापर धोकादायक

Updated: सोमवार, 25 मे 2020 (10:59 IST)
 
तर कधी घालावा मास्क?
जर आपण निरोग आहात आणि एखाद्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाची देखभाल करत असाल तर आपल्याला मास्क लावणे आवश्यक आहे.
 
जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल, घसा खवखवत असेल, थकवा जाणवत असेल पर मास्क घालावा आणि घरातच राहावे. 
 
काही लोकांना वाटतं की मास्क घातल्याने पूर्णपणे सु‍रक्षित झाला आहात तर असे नाही. मास्क वापरणे तेव्हाच फायद्याचे ठरेल जेव्हा आपले हात देखील स्वच्छ असतील.
 
हात स्वच्छ करण्यासाठी अॅल्कोहॉलयुक्त हँड सोप किंवा सेनेटाइजर वापरावे.
 
सर्वात आवश्यक म्हणजे आपल्याला मास्क घालणे आणि वापरण्याण्याची पद्धत माहीत असणे. 
 
कशा प्रकारे वापरावा मास्क?
तोंड आणि नाक पूर्णपणे झाकले जाईल असा मास्क घालावा. मास्क आणि तोंडामध्ये अंतर नसावा. 
 
मास्क घालताना मास्कला स्पर्श करु नये. मास्क घालताना आणि काढताना मास्कचा बेल्टची मदत घ्यावी. 
 
मास्क लवकरात लवकर बदलत राहावा.
 
एकदा वापरलेला मास्क दुसर्‍यांदा न वापरणे अधिक योग्य ठरेल. 
 
मास्क मागून काढणे योग्य ठरेल. समोरच्या बाजूने त्याला हात लावणे योग्य नाही. 
 
वापरलेला मास्क लगेच नष्ट करावा.
 
मास्क कमी वेळासाठी घालावा. खूप वेळापर्यंत मास्क लावून ठेवणे योग्य नाही. 
 
अधिक वेळ मास्क घालण्याचे दुष्‍परिणाम
डॉक्टरांप्रमाणे जास्त वेळेपर्यंत मास्क लावणे हानिकारक ठरु शकतं. याने दृष्टी कमी होते. ऐकण्यात समस्या येते. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. याने उच्च रक्तदाब तसेच हार्ट रेट वाढू शकतं. याने रक्तात ऑक्सीजनची कमतरता जाणवू शकते. मेंदूला ऑक्सीजनचा पुरवणा कमी होऊ शकतो. कमजोरी येऊ शकते. 
 
एकटे असल्यास मास्क वापरु नये. कार चालवताना मास्क वापरण्याची गरज नाही. घरात कोणी आजारी नसल्यास मास्क वापरु नये. केवळ गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे.
 
काय म्हणतात डॉक्‍टर?
हानिकारक आहे मास्कचा अधिक वापर
‘मास्‍क केवळ बाहेर जाताना किंवा लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात असल्यास वापरावा. दिवसभर मास्क लावल्याने आमचे स्वत:चे ‍विषाणू आमच्या शरीरात प्रवेश करतात. मास्कची गरज नसताना मोकळा श्वास घ्यावा. 
 
डॉ अरविंद किंगर, ईएनटी विशेषज्ञ

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: हिंगोली जिल्ह्यात एकापाठोपाठ दोन भूकंपांचे धक्के जाणवले

शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – तिसऱ्या टप्प्यात ३.२७ लाख शेतकऱ्यांना ₹३१६० कोटी!

हॉटेलमध्ये २६ वर्षीय तरुण आणि ४६ वर्षीय महिलेचे मृतदेह आढळले; ९ दिवसांसाठी बुक केली होती खोली

ज्ञानू नाही तर नंदू राजीनामा देतील! अभिजीत दीपके यांचा इशारा, तर मुख्यमंत्री फडणवीसांना खुले आव्हान

"पीक वाया गेले, कर्ज कसे फेडू?"; लातूरमध्ये नैराश्यातून ६० वर्षीय शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

पुढील लेख
Show comments