Marathi Biodata Maker
✕

लीगमध्ये शाहरुख संघ विकत घेणार

Updated: शुक्रवार, 8 मे 2020 (16:02 IST)
 
शाहरुखच्या मालकीचे सध्या दोन संघ आहेत. आयपीएलमध्ये केकेआर आणि कॅरिबियन लीगमध्ये त्रिनिदाद हे दोन्ही संघ त्याच्या मालकीचे आहेत. आता इंग्लंडमधील हंड्रेड नावाची लीग सुरु होणार आहे. या लीगमध्येही शाहरुख संघ घेण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात तीन संघांची मालकी असलेला शाहरुख हा एकमेव मालक असू शकतो. कारण आतापर्यंत कोणत्याही मालकाने क्रिकेट विश्वात तीन संघ विकत घेतलेले नाहीत. त्यामुळे  आता या लीगमधील शाहरुख कोणता संघ विकत घेणार, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.
 
इंग्लंडमध्ये ही लीग या वर्षापासून सुरु होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे ही लीग आता पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाला कोरोना व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने क्रिकेट लीगमध्ये यजमान देशांतील मालकांनीच संघ विकत घ्यावा, असे ठरवले होते. पण त्यांनी हा नियम आता शिथिल केला आहे. त्यामुळे शाहरुख या लीगमधील संघ आता विकत घेऊ शकतो.
 
केकेआर संघाचे सर्व व्यवहार वेंकी मैसूर हे पाहत असतात. आता वेंकी यांनी केकेआर इंग्लंडच्या लीगमधील संघ विकत घेणार का याबाबत एक वक्तव्य  केले आहे. याबाबत वेंकी म्हणाले की, केकेआर इंग्लंडच्या लीगमधील संघ विकत घेणार, असे वृत्त आले होते. पण जर या लीगसाठी जर कोणी आम्हाला संपर्क केला तर आम्ही संघ विकत घेण्याबाबत विचार करू शकतो.
 
केकेआरमध्ये शाहरुखची सहमालकी आहे. केकेआरच्या मालकांमध्ये शाहरुखबरोबर जुही चावला आणि जय मेहता यांचा सहभाग आहे. केकेआरने 2012 आणि 2014 साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी गौतम गंभीर हा संघाचा कर्णधार होता. पण गेल्या हंगामात केकेआरला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकवर गदा येऊ शकते, असे चाहते म्हणत आहेत.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

ChatGPT केवळ उत्तरेच देणार नाही, तर दाखवून स्पष्टीकरणही देईल! नवीन Intelligent UI वैशिष्ट्य सादर

कमी वेळेत आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारे फळपीक: पपई लागवड

मी ८ युद्धे थांबवली, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारावर दावा केला

प्राचीन परंपरांना आधुनिक साहित्याशी जोडल्याबद्दल कॅनेडियन लेखिका ॲन कार्सन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्रदान

LIVE: महाराष्ट्र सरकारने राज्यात १० नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यास मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments