शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: इस्लामाबाद , मंगळवार, 5 मे 2020 (14:31 IST)

टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचे आहे : शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे चर्चेत आहे. आता अख्तरने थेट भारताच्या क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
शोएबने हॅलो अॅवपवरून खास संवाद साधला. त्यावेळी त्याने मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने मुलाखतीमध्ये भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली. भारतीय क्रिकेट संघात चांगले गोलंदाज आहेत. बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सध्याच्या घडीला सर्वोत्तम आहेत. जर मला संधी मिळाली, तर मला भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनायला आवडेल. कारण मला भारतातही माझ्यासारखेच वेगवान गोलंदाज तयार करायचे आहेत. जर मला आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून संधी मिळाली, तर कोलकाता संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला आवडेल, असे तो म्हणाला.
 
शोएब अख्तरने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचे कौतुक केले. हार्दिक पांड्याकडे जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनण्याची क्षमता आहे. शोएब अख्तरने सचिन आणि राहुल द्रविडबाबतही महत्त्वाची गोष्ट सांगितली. सचिन आणि सुनील गावसकर हे महान खेळाडू होते. पण सचिनपेक्षा द्रविडला बाद करणे अधिक कठीण होते, असेही अख्तर म्हणाला.