शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (12:46 IST)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याप्रमाणे भारतीय सिनेमे अश्लील, याने वाढतात गुन्हे

Indian Cinemas
बॉलीवूडचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. याहून पाकिस्तानला देखील वगळता येणार नाही कारण तेथे मोठ्या प्रमाणात प्रेक्षक भारतीय सिनेमांचे चाहते असल्याचे समोर येतं. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी घातल्यामुळे तेथे बॉलीवूडचे सिनेमे प्रदर्शित होत नसले तरी पायरेटेड कॉपीच्या मदतीने प्रेक्षक जुळलेले आहे. पण आश्चर्यची बाब म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय सिनेमे अश्लील वाटतात. त्यांच्याप्रमाणे याचा तरुण पीढीवर वाईट परिणाम होतो.
 
रमजानच्या महिन्यात पाकिस्तानातील सरकारी वाहिनी पीटीव्हीने तुर्कीतील मालिका 'दिरीलिः एर्तुगरल' प्रक्षेपित केली असून या मालिकेचं कौतुक करत इमरान खान म्हणाले की हॉलिवूड किंवा बॉलिवूडसारख्या थर्ड पार्टीच्या कार्यक्रमांपेक्षा अशा मालिकांच्या मदतीने तरूण पुढीला इस्लामिक इतिहास, मूल्य आणि संस्कृतीबद्दल शिक्षण मिळेल. 
 
इमरान यांच्यामते हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये वेस्टर्न कल्चरला प्रोत्साहन दिलं जातं. भारताने देखील पाश्चात्य संस्कृती ओढली असून बॉलीवूडच्या सिनेमात तसेच भारतीय मालिकेत देखील अश्लिलता दाखवली जाते ज्याचा परिणाम तरुण पीढीवर होत असून ते क्राईमकडे वळतात. त्यांनी हे देखील म्हटले की काही दशकांपूर्वीपर्यंत भारतीय सिनेमे असे नव्हते.