Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक ! आता मेंदूत ब्लॅक फंगस

Updated: शनिवार, 12 जून 2021 (21:06 IST)
 
बिहारची राजधानी पाटणा येथे हा घडलेला प्रकार आहे. येथील आयजीआयएमएस रुग्णालयात एक 60 वर्षीय रुग्णावर शस्त्र क्रिया करून तब्ब्ल क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात आला आहे. ही शस्त्रक्रिया 3 तास चालली. हा चेंडू एवढा ब्लॅक फंगस काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. सर्वत्र या ब्लॅक फंगस बद्दल चर्चा होत आहे.
 
शस्त्रक्रिया केलेल्या डॉक्टरांच्या टीमच्या म्हणण्यानुसार ही शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची होती. कारण मेंदुत काळ्या बुरशीचं जाळं पसरलं होतं. आयजीआयएमएसचे चिकित्सा अधिक्षक डॉ. मनीष मंडल यांनी सांगितलं की, "जमुई येथे राहणाऱ्या 60 वर्षीय अनिल कुमार यांना सारखी चक्कर येत होती. त्यात ते वारंवार बेशुद्धावस्थेत जात होते. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत जात होती. चाचणीतून ब्लॅक फंगस असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे  त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर त्यांना या शस्त्रक्रियेत यश मिळाले आहे.
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments