ganesh chaturthi
✕

तीन देशात होऊ शकते आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन

Updated: गुरूवार, 7 मे 2020 (15:04 IST)
 
आयपीएलचा तेरावा हंगाही बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. 29 मार्चपासून सुरु होणारा आयपीएलचा हंगाम बीसीसीआयने सर्वप्रथम 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलला. मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने बीसीसीआयने या हंगामाचे आयोजन स्थगित केले आहे. आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला हजारो कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे स्पर्धा पूर्णपणे रद्द न करता वर्षाअखेरीस आयपीएल खेळवता येईल का, याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.
 
बीसीसीआयने श्रीलंका, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेत ही स्पर्धा घेण्याबाबत विचार सुरू केला आहे.
 
1) श्रीलंका – श्रीलंकेमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असला तरीही या देशातील परिस्थिती फारशी गंभीर नाही. लंकन सरकारने आतापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. येत्याकाही दिवसांमध्ये लंकेत परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर इथे आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शी सिल्वा यांनी बीसीसीआयसमोर आयपीएल श्रीलंकेत भरवण्याचा पर्याय ठेवला होता.
 
2) न्यूझीलंड - इतर देशांच्या तुलनेत न्यूझीलंडमध्येही कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोकत आहे. पुढील काही दिवसांत न्यूझीलंडमधील परिस्थिती नियंत्रणात येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी भारतीय खेळाडूंनी न्यूझीलंडचा दौरा केला होता, त्यामुळे इकडचे वातावरण, खेळपट्टी याचा खेळाडूंना अंदाज आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड हा आयपीएलच तेराव्या हंगामच्या आयोजनासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
 
3) दक्षिण आफ्रिका - श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन देशांच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेत परिस्थिती फारशी योग्य नाही. या देशातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र येत्या काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आल्यास दक्षिण आफ्रिकेत आयपीएल आयोजनाबद्दल विचार केला जाऊ शकतो. कारण 2009 साली भारतात निवडणुकांमुळे आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका हा देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो.
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments