शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 9 एप्रिल 2020 (22:08 IST)

भारताकडून इतर देशांना मदत सुरु

कोरोनाचा सामना करण्यासाठी  भारताने इतर  देशांना मदत पाठवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला अत्यंत महत्वाचे ठरणारे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध भारताने या देशांना पाठवले आहे. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन ही गोळी करोना व्हायरसवर अत्यंत प्रभावी ठरत आहे. अ
 
भारताने भूतान, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, मॉरिशेस आणि अन्य आफ्रिकन देशांना औषधे पाठवली आहेत. मंगळवारी एअर इंडियाच्या विमानातून १० टन औषधे श्रीलंकेमध्ये पोहोचवण्यात आली. शेजारी देशांना पाठवलेल्या औषधांमध्ये पॅरासीटेमॉल आणि हायड्रोक्सी क्लोरोक्वाईनचा समावेश आहे.
 
अमेरिका, स्पेन, ब्राझील, बहरीन, जर्मनी आणि यूके या देशांनी भारतीय औषध कंपन्यांबरोबर करार केले होते. Covid-19 वरील उपचारांसाठी या देशांना औषध निर्यात करण्यालाही भारत सरकारने मंजुरी दिली आहे. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीला परवानगी दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.