मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हैद्राबाद , रविवार, 5 एप्रिल 2020 (07:37 IST)

लॉकडाऊन दरम्यान हैद्राबादमध्ये बंद दुकानातून 70 हजारांची दारु चोरी

हैद्राबादमधील गांधीनगर परिसरात लॉकडाऊन दरम्यान बंद दारुचे दुकान चोरट्यांनी फोडून 70 हजार रुपयांची दारुची आणि 15 हजार रुपये चोरी केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहे.

लॉकडाऊनमध्ये दारुचे दुकानं बंद आहेत. त्यामुळे हैद्राबादमधील गांधीनगर येथील बोईगुडामधील वेंकटेश्वरा वाइन शॉपच्या छतावरुन चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला आणि 70 हजारांची दारु आणि 15 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली.

चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पण गोडाऊनमधील सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद झाली नाही. कारण चोरट्यांनी तेथील सीसीटीव्हीची वायर कापून टाकली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.