मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: औरंगाबाद , शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (08:38 IST)

दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एन ४, आरेफ कॉलनी सील

दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी (दि.२) प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आरेफ कॉलनी आणि सिडको एन ४ परिसर सील करण्यात आला. पोलिसांनी बॅरीकेड टाकून येथील रस्ते बंद केले. आता शुक्रवारपासून (दि.३) येथील सर्व रहिवाशांची स्क्रिनिंग होईल. आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरात तपासणी करणार आहे.
 
गुरुवारी दोन रुग्णांचे नमूने पॉझिटिव्ह आले. त्यातील एक महिला रुग्ण सिडको एन ४ भागातील असून एक पुरुष रुग्ण हा आरेफ कॉलनीतील आहे. या दोन्ही रुग्णांचा अहवाल प्राप्त होताच आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन अलर्टवर आले. खबरदारी म्हणून रात्री उशिरा आरेफ कॉलनी आणि सिडको एन ४ परिसर सील करण्यात आला. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेडस टाकून येथील रस्ते बंद केले. आता या भागातील नागरिकांना बाहेर पडण्यास तसेच त्या भागात इतरांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येथील अनेक रहिवाशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले असू शकतात, त्यांनाही या आजाराचा धोका होऊ शकतो ही बाब विचारात घेऊन आता या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे.