Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दासबोध दशक एकोणिसावा - शिकवणनाम

Updated: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (17:42 IST)
 
 
समास दहावा : विवेकलक्षणनिरूपण
 
॥ श्रीरामसमर्थ ॥ जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धारणा । जेथें अखंड राजकारणा । मनासी आणिती ॥ १ ॥ सृष्टीमधें उत्तम गुण । तितुकें चाले निरूपण । निरूपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥ चर्चा आशंका प्रत्योत्तरें । कोण खोटें कोण खरें । नाना वगत्रुत्वें शास्त्राधारें । नाना चर्चा ॥ ३ ॥ भक्तिमार्ग विशद कळे । उपासनामार्ग आकळे । ज्ञानविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥ वैराग्याची बहु आवडी । उदास वृत्तीची गोडी । उदंड उपाधी तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥ प्रबंदाचीं पाठांतरें । उत्तरासी संगीत उत्तरें । नेमक बोलतां अंतरें । निववी सकळांचीं ॥ ६ ॥ आवडी लागली बहु जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना । दळवट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥ उपासना करूनियां पुढें । पुरवलें पाहिजे चहुंकडे । भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥ जाणती परी आडळेना । काये करितो तें कळेना । नाना देसीचे लोक नाना। येऊन जाती ॥ ९ ॥ तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें भरावीं । कडोविकडीचीं विवरावीं । अंतःकर्णें ॥ १० ॥ किती लोक तें कळेना । किती समुदाव आकळेना । सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली ॥ ११ ॥ फड समजाविसी करणें । गद्यपद्य सांगणें । परांतरासी राखणें । सर्वकाळ ॥ १२ ॥ ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणें विवेक । सावधापुढें अविवेक । येईल कैचा ॥ १३ ॥ जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें । शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ॥ १४ ॥ परोपरीं सिकवणें । आडणुका सांगत जाणें । निवळ करुनी सोडणें । निस्पृहासी ॥ १५ ॥ होईल तें आपण करावें । न होतां जनाकरवीं करवावें । भगवद्भजन राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥ आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें । आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥ जुन्या लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला । जितुकें होईल तितुक्याला । आळस करूं नये ॥ १८ ॥ देह्याचा अभ्यास बुडाला । म्हणिजे महंत बुडाला । लागवेगें नूतन लोकांला । शाहाणे करावें ॥ १९ ॥ उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये । निसुगपण कामा नये । कोणीयेकविषीं ॥ २० ॥ काम नासणार नासतें । आपण वेडें उगें च पाहातें । आळसी हृदयसुन्य तें । काये करूं जाणें ॥ २१ ॥ धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला । नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनी शिकवाव्या ॥ २२ ॥ व्याप होईल तों राहावें । व्याप राहातां उठोन जावें । आनंदरूप फिरावें । कोठें तऱ्ही ॥ २३ ॥ उपाधीपासून सुटला । तो निस्पृहपणें बळावला । जिकडे सानुकूळ तिकडे चालिला । सावकास ॥ २४ ॥ कीर्ति पाहातं सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ति नाहीं । केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तऱ्ही ॥ २५ ॥ येरवीं काय राहातें । होणार तितुकें होऊन जातें । प्राणी मात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥ अधींच तकवा सोडिला । मधेंचि धीवसा सांडिला । तरी संसार हा सेवटाला । कैसा पावे ॥ २७ ॥ संसार मुळींच नासका । विवेकें करावा नेटका । नेटका करितां फिका । होत जातो ॥ २८ ॥ ऐसा याचा जिनसाना । पाहातां कळों येतें मना । परंतु धीर सांडावाना । कोणीयेकें ॥ २९ ॥ धीर सांडितां कये होतें । अवघें सोसावें लागतें । नाना बुद्धि नाना मतें । शाहाणा जाणे ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेकलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥ दशक एकोणविसावा समाप्त ॥

सर्व पहा

चाणक्य नीती : जीवनसाथी निवडण्यापूर्वी चाणक्य यांनी सांगितलेले ४ आवश्यक नियम जाणून घ्या

रक्षाबंधनादिवशीच होणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या 'सूतक' काळ आणि राखी बांधण्याची शुभ वेळ

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सदाशिवपञ्चरत्नम् : भगवान शिवाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र दर सोमवारी पठण केल्याने लाभ मिळेल

नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments