रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (23:13 IST)

Bhai Dooj 2022 Muhurat भाऊबीज 2022 शुभ मुहूर्त, काय करावे काय नाही

पौराणिक कथेनुसार सूर्य पुत्री यमी अर्थात् यमुनाने आपल्या भाऊ यमाला कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया तिथीला आपल्या घरी निमत्रंण देऊन आपल्या हाताने तयार स्वादिष्ट भोजन करवले. भोजन करुन यमराज खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या बहिणीला एक वर मागायला सांगितले. तेव्हा यमुनाने आपल्या भाऊ यमाकडे वर मागितले आजच्या दिवशी जी बहिणी आपल्या भावाला भोजनासाठी निमंत्रण देईल आणि त्याला तिलक करुन ओवाळेल त्याला यमाची भीती नसणार.
 
असे वर मागितल्यावर यमराज ने बहिणीला तथास्तु म्हणत वर दिले. अशात या दिवशी जो कोणी भाऊ आपल्या बहिणीकडे जेवतो तिच्याकडून औक्षण करवून घेतो त्या भाऊ-बहिणींना यमाची भीती नसते.
 
कार्तिक महिन्याची द्वितीया तिथी 26 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 2 वाजून 42 मिनिटापासून लागेल. ही तिथी 27 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटाला संपेल. यंदा 26 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार.
 
भाऊबीज -  26 ऑक्टोबर रोजी दुपारी 01 वाजून 18 मिनिटापासून ते 03 वाजून 33 मिनिटापर्यंत राहील.
 
काय करावे-
भाऊबीज या दिवशी बहिणींनी आपल्या भावाला भोजनाचे निमंत्रण द्यावे. आपल्या हाताने तयार स्वादिष्ट भोजन करवावे आणि औक्षण करावं. भोजनानंतर भावाला तांबूल म्हणजे विडा द्यावा. याने बहिणीचं सौभाग्य अखंड राहतं असे मानले जाते.
 
काय करु नये-
शास्त्रानुसार या दिवशी जो भाऊ स्वत:च्या घरी जेवतो त्याला दोष लागतो. जर बहिणीकडे जाणे शक्य नसेल तर नदीकाठी किंवा गायीला आपली बहिण समजून तिच्याजवळ बसून जेवण करणे उत्तम मानले जाते.
 
यमुना स्नान-
अशी देखील मान्यता आहे की यम द्वितीया तिथीला जे भाऊ-बहिण यमुना स्नान करतात त्यांना यमराजची भीती नसते आणि त्यांना यमलोक जावं लागत नाही.