मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (23:14 IST)

Bhau Beej अशा भावांना नसते यमाची भीती

bhai dooj
पौराणिक कथेनुसार सूर्य पुत्री यमी अर्थात यमुनेने आपल्या भाऊ यमाला कार्तिक शुक्ल पक्षाची द्वितीया तिथीला भावाला आपल्या घरी आमंत्रण देऊन आपल्या हाताने तयार भोजन खाऊ घातलं त्यावर प्रसन्न होऊन यमराजने वर मागायला सांगितले तेव्हा यमुनेने म्हटले की आजच्या दिवशी ज्या बहिणी आपल्या भावाला घरी बोलावून भोजन करवून त्याला तिलक करेल त्याला यमाची भीती नसावी. असे म्हटल्यावर यमराज ने तथास्तु म्हणत आपल्या बहिणीला वर दिले.
 
काय करावे-
भाऊबीजेच्या दिवशी बहिणींना आपल्या भावाला निमंत्रण देऊन आपल्या हाताने तयार स्वादिष्ट भोजन खाऊ घालावे. नंतर ताम्बूळ अर्थात विडा द्यावा. याने बहिणीचं सौभाग्य वाढतं.
 
काय टाळावे-
शास्त्रानुसार या दिवशी भावाने स्वत:च्या घरी भोजन केल्याने त्याला दोष लागतो. बहिणीच्या घरी जाणे शक्य नसल्यास एखाद्या नदीकाठी बसून किंवा गायीला बहीण समजून गायीजवळ बसून जेवण करणे योग्य ठरेल.
 
यमुना स्नान-
यम द्वितीयेला यमुना नदीत स्नान करणार्‍या बहीण आणि भावाला यमराजाची भिती नसते आणि त्यांना यमलोक बघावं लागत नाही.