भाऊबीज आज, ओवळींन आज दिशी
इवलीशी बीज निघते आकाशी,
भाऊबीज आज,ओवळींन आज दिशी,
थोडया वेळ दिसे सांजवेळी बीज,
लगबग होई सारी,लवकर होई सांज.
बहीण-भावा च्या प्रेमाची साक्ष आज असें,
ओवळण्या भावास बहीण आतुर होतसे,
माहेरी जाण्यास आतुर नववधू कशी होई,
चिमुकल्या भावास भेण्यास मन धाव घेई,
प्रत्येक बहिणीस तिचा भाऊ भेटो आज,
हीच प्रार्थना आहे देवा,एवढे कराचं!
..अश्विनी थत्ते