Marathi Biodata Maker
✕

Valentine Special फक्त ५ मिनिटांत बनवा व्हॅलेंटाईन स्पेशल 'स्ट्रॉबेरी डिलाईट' मॉकटेल

Updated: मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 (15:26 IST)
 
स्ट्रॉबेरी रोझ मॉकटेल (Strawberry Rose Mocktail)
 
साहित्य:
ताजी स्ट्रॉबेरी: ४-५ (बारीक चिरलेली)
पुदिना पाने: ७-८
लिंबाचा रस: १ मोठा चमचा
साखर किंवा मध : २ चमचे (तुमच्या आवडीनुसार)
बर्फाचे तुकडे: गरजेनुसार
सोडा किंवा स्प्राइट: १ ग्लास
 
कृती: एका मोठ्या काचेच्या ग्लासमध्ये स्ट्रॉबेरीचे तुकडे, पुदिना पाने आणि लिंबाचा रस घ्या. चमच्याच्या साहाय्याने हे सर्व हलके मॅश करा, जेणेकरून स्ट्रॉबेरीचा रस आणि पुदिन्याचा सुगंध बाहेर येईल.
यामध्ये आता साखर किंवा मधाचा पाक टाकून नीट हलवून घ्या.
ग्लासमध्ये भरपूर बर्फ टाका. (मॉकटेल जेवढे थंड, तेवढे चविष्ट लागते!)
आता ग्लासमध्ये सोडा किंवा स्प्राइट वरून ओता.
ग्लासच्या कडेला एक स्ट्रॉबेरी कापून लावा आणि वरून पुदिन्याचे एक पान ठेवा.

काही खास टिप्स 
ग्लासच्या कडेला थोडा लिंबाचा रस लावून तो साखरेमध्ये घोळवा, यामुळे ग्लासला एक 'क्रिस्टल लुक' येईल.
जर तुम्हाला आवडत असेल, तर यात एक थेंब गुलाब पाणी टाका, ज्यामुळे एक छान सुगंध येईल.
हे मॉकटेल सर्व्ह करताना छान म्युझिक लावा आणि तुमच्या जोडीदाराला सरप्राईज द्या!

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Vasubaras 2026 Wishes in Marathi वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी

अमावस्येच्या रात्री शारीरिक संबंध ठेवू नयेत, असे का म्हटले जाते?

मैदा न वापरता बनवा चविष्ट शंकरपाळे; गव्हाच्या पिठाची सोपी रेसिपी

बाजारातून फराळ आणण्याऐवजी घरी बनवा हे ५ पदार्थ; खर्चाचेही होईल नियोजन

तेलाचा वारंवार पुनर्वापर करताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पुढील लेख
Show comments