रविवार, 11 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: शनिवार, 13 डिसेंबर 2025 (12:03 IST)

हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्यासाठी खूप फायदेशीर आरोग्यवर्धक आल्याचे सूप रेसिपी

Ginger Hot Soup
साहित्य-
आले - १.५ इंच तुकडा
पाणी- दोन कप
लिंबाचा रस-एक चमचा
काळी मिरी पूड -अर्धा चमचा
मीठ चवीनुसार
तूप किंवा तेल-अर्धा चमचा
जिरे-१/४ चमचा

कृती-
सर्वात आधी आल्याचा तुकडा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. आता आले किसून घ्या किंवा मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. तसेच पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. जिरे घाला जिरे तडतडले की त्यात किसलेले आले घाला आणि एक मिनिट परतून घ्या. परतलेल्या आल्यामध्ये २ कप पाणी घाला. मीठ आणि काळी मिरी पूड घाला. सूपला चांगली उकळी येऊ द्या. साधारण ५  मिनिटे मंद आचेवर उकळू द्या, जेणेकरून आल्याचा अर्क पाण्यात उतरेल. आता गरम सूप एका गाळणीने गाळून घ्या. गाळल्यामुळे आल्याचे तंतू किंवा किस निघून जाईल आणि सूप पिण्यास सोपे होईल. गाळलेल्या सूपमध्ये लिंबाचा रस मिसळा. तसेच तुम्हाला हवे असल्यास सूप उकळताना चिमूटभर हळद किंवा तुळशीची पाने देखील घालू शकता. तर चला तयार आहे आरोग्यवर्धक आल्याचे सूप रेसिपी, गरम नक्कीच सेवन करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik