Dharma Sangrah
✕

Chandra Grahan 2023 वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे 2023 रोजी, भारतात दिसेल की नाही जाणून घ्या

Updated: शनिवार, 29 एप्रिल 2023 (12:02 IST)
 
2023 सालातील पहिले चंद्रग्रहण First Lunar Eclipse Of 2023
या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे 2023 रोजी होणार आहे. 5 मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे ज्याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. चंद्रग्रहणाची वेळ रात्री 8:45 आहे. पहाटे एक वाजेपर्यंत चंद्रावर ग्रहण राहील. चंद्रग्रहणाचा परमग्रास रात्री 10.53 वाजता होईल. या चंद्रग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हटले जात आहे. जेव्हा सुर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा हे ग्रहण होते. यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, जी चंद्र पृथ्वीने 70 टक्के पर्यंत झाकलेले असताना उघड्या डोळ्यांनी पाहता येते.
 
कुठे-कुठे दिसणार चंद्र ग्रहण 
युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिका या ठिकाणांहून चंद्रग्रहण पाहिले जाऊ शकते. हे चंद्रग्रहण भारतातून पाहता येणार नाही.
 
सुतक काळ लागणार ?
सुतक काल म्हणजे ज्या कालावधीत ग्रहण होते. धार्मिक श्रद्धेनुसार हा काळ अशुभ मानला जातो आणि असे म्हटले जाते की सुतक काल झाल्यास व्यक्तीने काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी. मे महिन्यातील पहिले चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही.
 
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.

सर्व पहा

श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

भाऊबीजेला भावाला ओवाळण्यासाठी पूजेच्या ताटात 'या' गोष्टी नक्की ठेवा!

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments