Marathi Biodata Maker
✕

Khagras Chandra Grahan 2026 भारतात कुठे कुठे दिसणार चंद्रग्रहण? स्पर्श, मोक्ष याबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती

Updated: मंगळवार, 3 मार्च 2026 (08:00 IST)
मोक्ष : १८.४८
 
हे चंद्रग्रहण भारतात ग्रस्तोदित दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल. भारतात कोठेही या ग्रहणाचा स्पर्श, मध्य दिसणार नाही. गुजरातमधील राजकोट, वेरावळ, पोरबंदर, जामनगर, जुनागड, गांधीधाम या प्रदेशात सायंकाळी ०६.४८ नंतर सूर्यास्त होत असल्याने या प्रदेशात हे ग्रहण दिसणार नाही. म्हणून त्या प्रदेशात ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत.
 
ग्रहण पुण्यकाल - चंद्रोदयापासून (आपल्या गावच्या सूर्यास्तापासून) ग्रहण मोक्षापर्यंत अल्पकाळ पुण्यकाल आहे.
 
वेधारंभ - हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने रविवारी, दि. ३ मार्च २०२६ च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ०६.४८ पर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवतींनी रविवारी सकाळी ११ पासून मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, जप, श्राद्ध, नित्यकर्मे इ. करता येते. वेधामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. मात्र वेधकाळात इतर आवश्यक असे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग करणे, झोप घेणे ही कर्मे करता येतात. ग्रहणपर्व काळात म्हणजे आपल्या गावच्या सूर्यास्तापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ०६.४८) या काळात पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
 
ग्रहणाचे राशिपरत्वे फल - मिथुन, तुला, वृश्चिक, मीन या राशींना शुभफल. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्रफल. वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
 
ग्रहणातील कृत्ये - 
सूर्यास्त होताच स्नान करावे. 
पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान यापैकी जे शक्य असेल ते करावे. 
पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. 
ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. 
अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.
 
भारतातील चंद्रग्रहणाचे प्रदेशानुसार दृश्यमानता:
पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागातून पूर्ण चंद्रग्रहण दिसेल, तर पश्चिम भारतात उपछाया चंद्रग्रहण दिसेल, कारण पूर्ण ग्रहण संपल्यानंतर येथे चंद्र उगवेल.
 
भारतातील या शहरांमधून चंद्रग्रहण पाहता येईल:
नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, भुवनेश्वर, पटना, गुवाहाटी, इम्फाळ, शिलाँग, कोहिमा आणि इटानगर ही भारतातील काही प्रमुख शहरे आहेत जिथे चंद्रग्रहण वेगवेगळ्या टप्प्यात दिसेल.

सर्व पहा

Shardiya navratri 2026 : शारदीय नवरात्रीमध्ये गरबा उत्सवा दरम्यान काय करावे आणि काय करू नये

भुलाबाईची गाणी संपूर्ण Bhulabai Song Marathi

मुलांसाठी देवी दुर्गेवरून युनिक आणि अर्थपूर्ण नावे Unique Baby Boy Names

माहुरगडावरी देवीची आरती Mahur Gadavari Aarti

मां ब्रह्मचारिणी आरती : जय अंबे ब्रह्माचारिणी माता

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments