Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छायाकल्प चंद्रग्रहण म्हणजे काय? ग्रहणांविषयी तुमच्या 11 प्रश्नांची उत्तरं

Updated: शुक्रवार, 5 मे 2023 (10:18 IST)
 
पृथ्वीची प्रच्छाया चंद्रावर पडते तेव्हा खग्रास किंवा खंडग्रास स्थिती दिसू शकते. पण जेव्हा पृथ्वीची उपछाया चंद्रावर पडते तेव्हा त्या पुसटशा सावलीनं जे ग्रहण दिसतं, त्याला छायाकल्प चंद्रग्रहण किंवा penumbral lunar eclipse असं म्हणतात.
 
कधी कधी सावलीतला हा फरक मानवी डोळ्यांना चटकन लक्षात येईल इतका प्रभावी नसतो. अतिशय छोट्या स्वरुपाचं हे ग्रहण असतं.
 
3. खग्रास चंद्रग्रहण आणि ब्लड मून म्हणजे काय?
चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत total lunar eclipse.
 
खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं.
 
4. खंडग्रास चंद्रग्रहण केव्हा दिसतं?
चंद्राचा फक्त काही भागच पृथ्वीच्या सावलीखाली आला तर खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यालाच इंग्रजीत partial solar eclipse म्हणतात.
 
ही सावली किती मोठी आहे, तितका याचा प्रभाव दिसून येतो. यावेळी चंद्रावर गडद लालसर ते चॉकलेटी रंगछटा दिसून येतात.
 
5. खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय?
पृथ्वीवरून पाहताना सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्याला 'खग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात.
 
एरवी चंद्र सूर्यापेक्षा, अगदी पृथ्वीपेक्षाही खूपच लहान आहे. पण तो पृथ्वीपासून जवळ आहे. त्यामुळं त्यामुळं पृथ्वीवरून पाहताना आपल्याला सूर्य आणि चंद्र आकारानं एकसारखे दिसतात. आणि म्हणूनच खग्रास स्थितीत चंद्राचं बिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकतं.
 
खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस एखाद्या कोपऱ्यातून सूर्यप्रकाश डोकावतो तेव्हा त्या स्थितीला 'डायमंड रिंग' म्हणजे हिऱ्याची अंगठी म्हणून ओळखलं जातं.
 
6. खंडग्रास सूर्यग्रहण कधी दिसतं?
सूर्याचा केवळ काही भाग झाकलेला दिसतो, त्याला 'खंडग्रास सूर्यग्रहण' असं म्हणतात. या ग्रहणादरम्यान सूर्याची ‘कोर’ पाहायला मिळू शकते.
 
खग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहणादरम्यान आसपासच्या प्रदेशात खंडग्रास स्थिती दिसू शकते.
 
7. कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?
पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षा काहीशा लंबगोलाकार आहेत. चंद्र या कक्षेत पृथ्वीपासून दूरच्या बिंदूजवळ असतो, अशा वेळी पृथ्वीवरून चंद्रबिंबाचा आकार सूर्यबिंबापेक्षा लहान दिसतो.
 
याचदरम्यान जेव्हा सूर्यग्रहण होतं, तेव्हा चंद्र सूर्यबिंबाच्या मधोमध येतो; पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर एखाद कंकणासारखी म्हणजे बांगडीसारखी सूर्याची कडा दिसून येते. त्यालाच 'कंकणाकृती सूर्यग्रहण' म्हणतात. सूर्याच्या या स्थितीला खगोलप्रेमींनी 'Ring of Fire', अग्निवलय, अग्निकंकण अशीही नावं दिली आहेत.
 
8. हायब्रीड सूर्यग्रहण काय असतं?
हायब्रिड सूर्यग्रहण हे अतिशय दुर्मिळ प्रकारचं सूर्यग्रहण आहे. यात काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खग्रास स्थिती पाहायला मिळते. 20 एप्रिस 2023 रोजी असं ग्रहण पाहायला मिळालं होतं.
 
पृथ्वी गोलाकार आहे आणि तिच्या पृष्ठभागावर तुम्ही नेमके कुठे, यावर तुम्हाला हे ग्रहण कसं दिसेल हे अवलंबून असतं. तुम्ही चंद्राच्या जवळ असाल तर सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. तुम्ही थोडं दूर असाल तर सूर्य पूर्ण झाकला न गेल्यानं तुम्हाला कंकणाकृती ग्रहण दिसेल.
 
9. ग्रहण किती वेळा दिसतं?
एका वर्षात संपूर्ण पृथ्वीवरून किमान दोन ते पाचवेळा सूर्यग्रहणं दिसू शकतात. त्यातलं एखाददुसरंच खग्रास ग्रहण असतं आणि तेही सगळ्याच देशांतून दिसत नाही. आणि कंकणाकृती ग्रहण पाहण्याची संधी त्याहीपेक्षा दुर्मिळ असते.
 
साधारणपणे प्रत्येक सूर्यग्रहणानंतर पुढच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण पाहता येतां. सूर्यग्रहण पृथ्वीवरील मर्यादित प्रदेशातून दिसतं तर चंद्रग्रहण तुलनेनं मोठ्या प्रदेशातून पाहता येतं.
 
10. ग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?
ग्रहण पाहताना कधीही सूर्याकडे थेट पाहू नका. कारण सूर्याच्या तीव्र कीरणांमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.
 
ग्रहण पाहण्यासाठीचे खास फिल्टर लावलेले चष्मे घालूनच ग्रहण पाहावे. पिनहोल कॅमेरा, घरातली चाळणी किंवा सौर दुर्बिणीच्या माध्यमातून सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या पडद्यावर पाडून ग्रहणाची स्थिती पाहता येते. पिनहोल कॅमेरा कसा तयार करायचा, त्याची माहिती इथे पाहू शकता.
 
तुमच्या शहरात किंवा शाळेत एखादं विज्ञानकेंद्र असेल तर तिथे अनेकदा ग्रहण पाहण्यासाठी विशेष सोय केलेली असेल. त्याविषयीची माहिती घ्या.
 
11. 'गैरसमज बाजूला सारून ग्रहणाचा आनंद घ्या'
ग्रहणाविषयी आपल्याकडे खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. राहू- केतू हे राक्षस सूर्याला गिळतात म्हणून सूर्यग्रहण होतं असं लोकांना वाटायचं. ग्रहणात हवा, पाणी अन्नपदार्थ दूषित होतात असा एक मोठा गैरसमज होता. त्यामुळं पूर्वी ग्रहण सुटल्यावर लोक आंघोळ करीत असत, साठवलेले सर्व पाणी ओतून टाकीत व नव्याने पाणी भरत असत.
 
पण अशा प्रथा चुकीच्या असल्याचं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सांगतात, "ग्रहण सुटले म्हणून आंघोळ करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण ग्रहणात काहीही अशुद्ध होत नाही. ग्रहणात जेवू नये, ग्रहणात झोपू नये, ग्रहणात मलमूत्र विसर्जन करू नये असेही सांगितले जाते.
 
"परंतु त्यात काहीही तथ्य नाही. काही लोक मला प्रश्न विचारतात की, आमच्या राशीला हे ग्रहण कसे आहे? मी त्यांना सांगतो, की जे लोक ग्रहण पाहतील, त्यामागचे वैज्ञानिक कारण समजून घेतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे."
Published By -Smita Joshi

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments