मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

उपवास रेसिपी : ‘साबुदाणा अप्पे’

Sabudan Appe
अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्रत ठेवतात. तसेच उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन देखील कंटाळ येतो. याकरिता आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचा आणखीन एक पदार्थ, जो सर्वांनाच आवडेल. तो पदार्थ आहे 'साबुदाणा अप्पे'. तर चला जाणून घेऊ या साबुदाणा अप्पे कसे बनवावे? जाणून घ्या रेसिपी. 
 
साहित्य-
1 वाटी साबुदाणा (भिजवलेला)
2 उकडलेले बटाटे  
1 कप भाजलेले शेंगदाणे 
1/4 चमचा काळी मिरे पूड 
2 हिरवी मिरची बारीक चिरलेली 
चवीनुसार सेंधव मीठ 
 
कृती-
साबुदाणा अप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा घ्या. आता यामध्ये मॅश केलेला बटाटा,  मिरे पूड, हिरवी मिरची, दाणे कूट,सेंधव मीठ घालावे. हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करून याचे बॉल्स तयार करून घ्या. आता लहान गॅस वर अप्पे पात्र ठेऊन त्याला तेल लावून घ्यावे. व आता यामध्ये हे बॉल्स ठेवून त्यावर 3 मिनिट झाकण झाकावे. तसेच हे बॉल्स दुसऱ्याबाजूने देखील तेल लावून शेकून घ्यावे. आता तयार बॉल्स प्लेट मध्ये शकतात. तर चला तयार आहे आपले उपवासाचे ''साबुदाणा अप्पे'' चटणी सोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik