शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (13:37 IST)

उपवास रेसिपी : शिंगाड्याच्या पिठापासून बनवा समोसे

samosa
साहित्य-
एक शिंगाड्याचे पीठ 
चवीनुसार सेंधव मीठ 
तूप 
पाणी 
दोन उकडलेले बटाटे  
दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
किसलेले आले 
एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर 
1/4 कप भाजलेले शेंगदाणे   
 
कृती-
सर्वात आधी शिंगाड्याच्या पिठात सेंधव मीठ मिक्स करावे. आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालावे. व चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता पाणी घालून पीठ मळावे. व हे मळलेले पीठ दहा मिनिट बाजूला ठेवावे. 
आता उकडलेले बटाटे घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची आणि आले पेस्ट घालावी. तसेच त्यामध्ये आता भाजलेले शेंगदाणे आणि सेंधव मीठ, कोथिंबीर घालावी. आता हे मिश्रण सामोसा बनवण्यास तयार आहे. 
 
आता शिंगाड्याच्या पिठाचे गोळे बनवून घ्यावे. व पोळी प्रमाणे लाटून मधून काप द्यावी. आत एक भाग हातात घेऊन त्यामध्ये हे बटाट्याचे मिश्रण भरून सामोस्याचा आकार द्यावा. आता एका कढईमध्ये तूप घालावे व तयार केले उपवासाचे सामोसे टाळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले उपवासाचे सामोसे, हे सामोसे तुम्ही उपवासाची शेंगदाणा चटणी किंवा फळांची चटणी यासोबत सर्व्ह करू शकता. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik