ganesh chaturthi

माझे बाबा

Updated: रविवार, 20 जून 2021 (10:38 IST)
 कोथिंबीर सोबतच निवडायचं होतं
मधेच एखाद्या जुन्या विनोदावर,
तुमच्या सोबत उगाचच हसायचं होतं
 
टी. व्ही बघताना औषध विसरल्यावर,
खोटं नाटं तुमच्यावर रागवायचं होतं
ओथंबून आलेल्या सर्व भावनांना,
मनमोकळ करून सांगायचं होतं 
 
नातवंडांच्या लग्न सोहळ्यात,
स्मित चेहरा घेऊन मिरवताना..
खुदकन हसून सर्वांशी बोलताना,
गर्वाने तुम्हाला पाहायचं होतं
 
ऊन पावसाच्या खेळात,
स्वयंपाकात आज काय करायचं
किती मीठ कमी, किती गोड कमी
हे अजून ठरवायचं होतं
 
माझी नवीन रचना प्रकाशित झाल्याचं,
सर्वप्रथम तुम्हालाच कळवायचं होतं
एखादं चित्र काढल्यावर पण,
प्रथम तुम्हालाच दाखवायचं होतं
 
तुमच्या वेगळेपणाच्या गंधानी,
ह्या घराचं वातावरण भरायचं होतं
तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकाराच्या,
एखाद्या चलचित्र किंवा नाटकाला न्यायचं होतं
 
कसल्याही परिस्थितीला हसून हाताळायचे,
हे तुमच्या कडूनच शिकायचं होतं 
तुमच्या प्रोत्साहनाची दोर धरून,
आकाशात उन्मुक्त उडायचं होतं
 
बरच काही तुमच्या साठी 
मला अजून करायचं होतं
आईच्या गळ्यात तुमच्या नावाचं,
एक नवं मंगळसूत्र घालायचं होतं
 
नातवंडांचे व्हिडीओ पाहून,
तृप्तीने कौतुक करताना पाहायचं होतं
संसाराच्या गूढ वनात आम्हाला एकटे सोडून,
असं घाईने तुम्हाला कुठे जायचं होतं?
 
ज्यांना आहे वडील
त्यांनी मनसोक्त संवाद साधावे,
नाही तर शेवटी म्हणाल,
" बाबा तुमच्याशी काही तरी म्हणायचं होतं,
काही तरी बोलायचं होतं.."
 
अंजना माणके
 
 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

रंगांच्या माध्यमातून मुले संविधान आणि हक्कांबद्दल शिकतील; अदिती तटकरे यांनी कलरिंग बुक प्रकाशित केले

'ना कोणताही प्रस्ताव, ना विलीनीकरण'; एनडीएमध्ये प्रवेशाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण; म्हणाल्या-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच

LIVE: आझाद मैदान पोलिसांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या 'चलो मुंबई' आंदोलनाला परवानगी नाकारली

अमेरिकेशी तनाव अन् चीन-रशियाशी जवळीक; SCO परिषदेत पंतप्रधान मोदींवर जगाच्या नजरा का?

ठाण्यातील कळवा खाडीच्या खोल पाण्यात मुंब्रा येथील तीन तरुण बुडाले

पुढील लेख
Show comments