Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणपतीच्या पूजेत महत्त्वाची २१ पत्री

Updated: बुधवार, 27 ऑगस्ट 2025 (07:54 IST)
 
डोरली - या रोपाला 'काटे रिंगणी' म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते.
 
डाळिंब - आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.
 
आघाडा - ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास मिळते.
 
विष्णुकांता - या वनस्पतीला आपल्याकडे 'शंखपुष्पी' म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू शकतो.
 
शमी - शमीला सुप्त 'अग्नीदेवता' असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी ठरते.
 
दुर्वा - ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला 'हरळ' म्हणतात. नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.
 
तुळस - ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.
 
धोतरा - धोतर्‍याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्‍या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला हमखास दिसतात.
 
बेलपत्र - शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.
 
माका - पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर - टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते.
 
मधुमालती - मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्‍ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्‍या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय. फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.
 
बोर - बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्‍यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.
 
हादगा - हादग्याला आपण 'अगस्ती' म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भ्‍ाजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.
 
केवडा - ही वनस्पती समुद्र किनार्‍यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.
 
या पत्रींचे महत्त्व:
प्रत्येक पत्री विशिष्ट देवतेशी निगडित आहे आणि गणपतीच्या पूजेत ती अर्पण केल्याने त्या देवतेचा आशीर्वाद मिळतो. उदाहरणार्थ, बिल्वपत्री शिवाशी संबंधित आहे, तर तुळस विष्णूशी.
 
या पत्रींमध्ये औषधी गुणधर्म असतात, जसे की अघाडा रोगनाशक आहे, तर तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. या पत्री स्थानिक वनस्पती असल्याने पर्यावरणाशी सुसंगत असतात आणि त्यांचा उपयोग पर्यावरण संतुलन राखण्यासही मदत होते. प्रत्येक पत्री जीवनातील विशिष्ट गुण किंवा शक्ती दर्शवते, जसे की पिंपळ ज्ञानाचे प्रतीक आहे, तर शमी विजयाचे. या पत्री अर्पण केल्याने मन, शरीर आणि वातावरण शुद्ध होते, ज्यामुळे पूजेचे फळ अधिक प्रभावी होते.
 
या पत्री गणपतीला अर्पण करताना प्रत्येक पत्रीचे नाव घेऊन मंत्र म्हणतात:ॐ [पत्रीचे नाव] नमः (उदा., ॐ दूर्वायै नमः).
या पत्री स्वच्छ धुऊन, गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा पायाजवळ अर्पण केल्या जातात. काही ठिकाणी या पत्रींची माळ बनवून गणपतीला अर्पण केली जाते.
 
टीप:जर एखादी पत्री उपलब्ध नसेल, तर दूर्वा सर्वात महत्त्वाची मानली जाते, कारण ती गणपतीला विशेष प्रिय आहे.

सर्व पहा

जन्माष्टमी २०२६: बाळगोपाळाला अर्पण करा 'हे' प्रिय नैवेद्य; 'या' ५ व्या भोगाशिवाय पूजा मानली जाते अपूर्ण!

हरतालिका तृतीयेला उपवास करणार्‍या महिलांनी आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी या चुका टाळा

गणपतीची मूर्ती बुक करण्याआधी या ५ गोष्टी तपासा; यंदा चुकूनही करू नका

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments