बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (17:00 IST)

आपल्या पक्षांसोबत राहा, पण यावेळी 'आप'ला मत द्या: केजरीवाल

Goa Assembly Elections 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यातील जनतेला अनोखे आवाहन केले. त्यांनी प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या मतदारांना 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन केले.
 
केजरीवाल म्हणाले की काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या मतदारांना मी आपापल्या पक्षांसोबत टिकून राहण्याचे पण 'आप'ला मतदान करण्याचे आवाहन करतो. ते म्हणाले की भाजपच्या मतदारांनी पक्षाला 15 वर्षे राज्य करण्यासाठी दिले. मला भाजपच्या मतदारांना विचारायचे आहे की, भाजपने तुमच्यासाठी काय केले?
 
केजरीवाल म्हणाले की काँग्रेस पक्षाने 25 वर्षे गोव्यावर राज्य केले पण गोव्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी काहीही केले नाही. पक्षाने फक्त घोटाळे केले.
 
भाजप सरकारांनी काँग्रेसच्या राजवटीचे घोटाळे लपवले. काँग्रेसने गेल्या 5 वर्षांत आपले आमदार भाजपमध्ये आणले. 2017-2019 दरम्यान काँग्रेसचे 13 आमदार भाजपमध्ये दाखल झाले. ते म्हणाले की म्हाला आठ आमदार मिळाले तरी आम्ही सरकार स्थापन करू, असा भाजपचा दावा करत आहे अर्थात आमदार विकत घेऊ, असे ते उघडपणे सांगत आहेत. इतका निर्लज्ज कोणी असू शकतो का? असा प्रश्न त्यांनी विचारला.