राहुल गांधी यांचा गोवा दौरा 4 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला गेला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा 2 फेब्रुवारीचा गोवा दौरा 4 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती देेत सांगितले की आता हा दौरा 4 फेब्रवारी रोजी होणार.
राहुल गांधी 2 फेब्रुवारीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या सांकेलीम येथे व्हर्च्युअल रॅली घेणार होते.
निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच राज्य दौरा असेल. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यात युती असून पक्षाने आतापर्यंत 36 उमेदवारांची घोषणा केली आहे.