सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (22:44 IST)

माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांची अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा

Laxmikant Parsekar
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रेम मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आल्यावर  भाजपचा राजीनामा देणारे पार्सेकर म्हणाले की त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षातील सर्व पदांचा त्याग केला आहे.
 
पार्सेकर यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. ते लवकरच उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे म्हणाले. मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून पक्षाने विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिली आहे.