रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

चाणक्य नीती: सहा गोष्टी, आपल्या माहीत असाव्या...

* मला अशी संपत्ती नको ज्यासाठी कठोर यातना सहन कराव्या लागे, किंवा सद्गुणाचा त्याग करावा लागे किंवा शत्रूची खुशामत करावी लागे.
* काटे आणि दृष्ट लोकांपासून वाचण्यासाठी दोन उपाय आहेत. पायात जोडे घाला आणि त्यांना लाज वाटायला इतकं भाग पाडा की समोराचा डोकं उंच करण्याची हिंमत न करता आपल्यापासून दूर राहील.
 
* अस्वच्छ कपडे परिधान करणारे, स्वच्छ दात नसणारे, खूप खाणारे, कठोर शब्द बोलणारे, सूर्योदयानंतर उठणारे, असे लोकांचे व्यक्तित्व कितीही महान का नसो, लक्ष्मीची त्यांच्यावर कृपा होत नसते.

* एका व्यक्तीला चारी वेद आणि सर्व धर्म शास्त्रांचे ज्ञान आहे. परंतू जर त्याला आपल्या आत्म्याची अनुभूती झाली नाही तर तो त्या चमच्याप्रमाणे आहे, ज्याने अनेक पक्वान्न हालवले परंतू कसला ही स्वाद घेतला नाही. 
 
* जे घडलं ते घडून गेलं. आपल्या हातून एखादे चुकीचे काम झाले तरी त्याची काळजी सोडून वर्तमान प्रामाणिकपणे जगून भविष्य सावरले पाहिजे.
 
* साप विषारी नसला तरी त्याने फोफावणे सोडू नये. तसेच कमजोर व्यक्तीने नेहमी आपल्या कमजोरीचे प्रदर्शन करू नये.