शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या मंदिरात भक्त चढवतात चपलांची माळ, मुसलमान पुजारी

असे मंदिर तर आपण खूप बघितले असतील जिथे देवाला सोनं, चांदी, रुपये, फळं, धान्य व इतर वस्तू चढवल्या जातात. परंतू अश्या मंदिराबाबद ऐकले आहे का जिथे देवीला प्रसन्न करण्यासाठी चपलांची माळ चढवली जाते.
 
कर्नाटकाच्या गुलबर्ग जिल्ह्यात गोला गाव स्थित लकम्मा देवी मंदिरात लोकं चप्पल चढवतात. मंदिरासमोर एक कडुनिंबाचे झाड आहे जिथे लोकं चप्पल बांधून देवीला साकडं घालतात.
येथे एक आणखी विशेष गोष्ट म्हणजे मंदिरात पूजा करणारा पुजारी हिंदू नसून मुसलमान आहे. दिवाळीनंतरच्या पंचमीला येथे मेळा भरतो. तेव्हा प्रसादच्या दुकानांसह चपलांच्या दुकानीही दिसतात. या दिवशी फुटविअर ‍फेस्टिव्हल आयोजित होतं ज्यात हजारो लोकं सामील होतात. असे म्हणतात की लोकं येथे येऊन नवस करतात आणि चप्पल बांधतात. नंतर नवस पूर्ण झाल्यावर देवीला चपलांची माळ चढवतात.