Dharma Sangrah
✕

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय सहावा

Updated: बुधवार, 19 जून 2024 (11:10 IST)
श्रीकृष्ण म्हणे धर्मराया ॥ ऐकी कथा प्रेम सखया ॥ कैलासाप्रती शंभु तया ॥ भेटी समस्त देव आले ॥११॥
प्रदोष समय परम पवित्र ॥ आनंदे असतां पंचवगंत्र ॥ गीत नृत्यादि महामंत्र ॥ होती तेव्हां शिवापुढें ॥१२॥
त्या समयी दक्ष येता झाला ॥ सर्वाहीं बहु सन्मान केला ॥ शिव तैसाच सिंहासनी बैसला ॥ दक्षाकडे न पाहे ॥१३॥
दक्ष उभा क्षण एक ॥ म्हणे जांवई जोडला शतमूर्ख ॥ सन्मान माझा न करी देख ॥ यासी ज्ञान नसे कांही ॥१४॥
सदां भुतांमाजि बैसे ॥ रुंडमाळा मिरवीत असे ॥ साक्षपे नंदीवर बैसे ॥ विभुती सर्व अंगी लाविली ॥१५॥
सर्प वेष्टी ठायी ठायीं ॥ निर्मळ न दिसे कांही ॥ विभुती चर्चि सर्व देही ॥ विदेही म्हणती त्यासी ॥१६॥
भिकारी अत्यंत दीन ॥ हातीं नरोटी घेऊन ॥ भिक्षा मागे दीनवदन ॥ भाग्य फुटलें दाक्षायणीचें ॥१७॥
ऐसेंनी दक्ष करीत ॥ विरुपाक्षी अन्न दे निर्भरीत ॥ दक्ष तेथून परतला ॥ कांही उत्तर न बोले तेधवां ॥१८॥
शिव आनंदे निर्भर ॥ दक्षगृहा आला सत्वर ॥ अकस्मात मुनी कपीलेश्वर ॥ येते झाले दक्षगृहा ॥१९॥
म्हेणे स्वामी महाऋषी ॥ तेज:पुंज पाव आम्हांसी ॥ दाविले अंजन नयनासी ॥ कृतकृतार्थ झालों म्हणे ॥२०॥
पूजन अर्चन जाहलिया ॥ दक्ष म्हणे ऋषीवर्या ॥ पुत्र प्राप्ती व्हावया ॥ स्वामी यज्ञ सांगा कांही ॥२१॥
कपिलमुनी म्हणतसे तयाला ॥ तुवां यज्ञ करावे वहिला ॥ करावे हे उचित तुजला ॥ सत्यसत्य त्रिवाचा ॥२२॥
दक्ष म्हणे महाऋषी ॥ यज्ञ आरंभावा आदरें ॥ मग प्रवर्तले साहित्यासी ॥ आनंदे अपार ॥२३॥
एक शंभु वेगळा करुन ॥ सकळ बोलाविले सुरगण ॥ यज्ञालागीं आरंभून ॥ आनंदे करिती मंत्रघोष ॥२४॥
इकडे कैलासाचे ठायीं ॥ आंबा पुष्येवचीता पाहे ॥ विमाने जाती लवलाही ॥ द्क्षयाग कारणें ॥२५॥
सागारीं देखतां जगतजननी ॥ देवें विमानें स्थिर करोनी ॥ जयजयकाराची ध्वनी ॥ उठल्या तेव्हां अपार ॥२६॥
अंबा पुसतसे समस्ता ॥ विमाने कोठें घेऊन जातां ॥ ते म्हणती दक्ष तुमचा तात ॥ यज्ञालागिं बोलाविलें तयानें ॥२७॥
अंबा म्हणे नवल झालें ॥ मज कां दक्षें अव्हेरिलें ॥ लवलाहे गंतव्य केलें ॥ शिवाजवळी पातला ॥२८॥
तेव्हां ती बैसलीसे म्लानवदन ॥ शंकर पुसे दयाधन ॥ कोणी केला अपमान ॥ खेद कासयाचा धरिला ॥२९॥
ती म्हणतसे नंदिवहना ॥ याग होतसे पितृसदना ॥ आपण चलावें पंचवदना ॥ मम समवेत पित्याच्या सदना ॥३०॥
शिव म्हणतसे दाक्षायणी ॥ न बोलावितां यज्ञालागुनी ॥ जातांच होईल सकृहानी ॥ म्हणोनी तेथें न जाईजे ॥३१॥
शिवाचें वचन ऐकोन ॥ देवीचे अश्रुने भरले नयन ॥ तो अकस्मात ब्रह्मानंदन ॥ नारदस्वामी पातले ॥३२॥
न सांग कळले तयासी ॥ म्हणी अगा हे कैलासवासी ॥ जगदंबेस यज्ञासी ॥ जातां मान नसे कांही ॥३३॥
अंबा म्हणतसे जावया मजला ॥ आज्ञा द्यावी मला ॥ शिव म्हणतसे नंदिला ॥ अंबा म्हणे दक्षायज्ञासी ॥३४॥
नंदी सिध्द झाला सत्वर ॥ आरुढोनी अंबावर ॥ पुढें होतसे वाद्यांचा गजर ॥ शिवगण अपार समागमे ॥३५॥
समागमें शंभु नसतां ॥ आणि उदास झाली जगन्माता ॥ ऐसे दुची असतां ॥ दक्षायागा पातली ॥३६॥
येतांचि देखिले पितृवदन ॥ द्क्ष पाहे अंबेचे वदन ॥ मग अंतरगृहांत जाऊन ॥ मातेजवळी पातली ॥३७॥
मातेनें धरिले ह्रदयीं ॥ चुंबन दिधलें लवलाही ॥ म्हणे सखे आज पाही ॥ आज मज थोर वाटला ॥३८॥
मग भगिनी एक शत ॥ त्याजकडे दाक्षायणी विलोकित ॥ तो त्या इजकडे न पहात ॥ भाग्यामध्यें भुलोनियां ॥३९॥
दाक्षायणी झाली लज्जित ॥ क्रोध आला अत्यंत ॥ म्हणी जिणे व्यर्थ ॥ सन्मान कांही न दिसेची ॥४०॥
कोपोनियां भवानी ॥ कुंडी घातली उडी तत्क्षणीं ॥ हाहा:कार झाला सर्व जनीं ॥ चिंता भरीत पै झाले ॥४१॥
नंदीस कोप आला थोर ॥ संग्रामा उभा दुर्धर ॥ पळाले कितीएक सुरवर ॥ यज्ञ विध्वंस जाहला ॥४२॥
पुढील अध्यायी कथा गहन ॥ विरभद्र होईल निर्माण ॥ परिसावें त्याचें चरित्र पूर्ण ॥ श्रवणें दोष नासती ॥४३॥
इति भविष्योत्तरपुराणे ब्रह्मोत्तरखंडे कोकिलामहत्म्ये ॥ षष्ठमोऽध्याय गोडहा ॥४४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥
॥ अध्याय सहावा समाप्त ॥

सर्व पहा

नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी ९ पारंपरिक लुक्स आणि स्टायलिंग टिप्स

शारदीय नवरात्रीत कन्या पूजन का केले जाते? किती मुलींना भोजन द्यावे आणि कोणते नियम पाळावेत?

तुळजापूर, कोल्हापूर की माहूर? देवीदर्शनासाठी कोणते ठिकाण निवडाल?

Navratri Garba Look नवरात्रीत दांडिया नाईटसाठी परफेक्ट ज्वेलरी गाईड; पाहा लेटेस्ट ट्रेंड्स

पितृतर्पण न केल्यास काय होते? दुष्परिणाम आणि त्यावरील धार्मिक उपाय

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments