स्नान करावें नदीतीरी ॥ ब्रह्मचर्य मासभरी ॥ भूमिशयन निर्धारी ॥ करावें मासपरीयंत ॥७॥
नक्त करावें भोजन ॥ सदय असावें अंत:करण ॥ जीव हिंसा गेलिया प्राण ॥ मासभर न करावी ॥८॥
असत्य न बोलावें जाण ॥ सदां सर्वदा हरी भजन ॥ ऐसें करिता व्रताचरण ॥ कैलासपद प्राप्त होईल ॥९॥
मंत्रस्नान यथायुक्त ॥ करावें भोजन एकभुक्त ॥ निंद्यवस्तु करा वित्यक्त ॥ उत्तम वस्तु भक्षावी ॥१०॥
तिळ आणि आवळकंठीचें ॥ पिष्ट करावें दोघांचें ॥ ते शरीरास लाविजे नेमाचे ॥ यथानुक्रमें ॥११॥
तदनंतरे अष्ठदीन ॥ शरीरीं लावावें सर्वोषधी चूर्ण ॥ त्याउपरी बावच्या आणून ॥ सौभाग्य अंगी लाविजे ॥१२॥
स्नानापूर्वी तिन्ही चूर्णे तीन प्रकारचीं ॥ आधि उटणीं लाविजें त्याची ॥ मग स्नानें करावीं प्रयोगाचीं ॥
व्रताचा दिप लाविजे अखंड ॥१३॥
ऐशा प्रकारे व्रत करील कोणी ॥ स्नानदान दीप लाउनी ॥ स्वरुपता मुक्ति शूळपाणी ॥ देतो त्यासी अक्षयीं ॥१४॥
जन्मोजन्मी सुंदर ॥ रुप देईल मनोहर ॥ परम भोळा कर्पूरगौर ॥ संकटीं रक्षी भक्तातें ॥१५॥
स्नान केलिया उपरी ॥ अर्ध्य अर्पावे सुगंधी निरी ॥ सूर्य पुजावा आदरी ॥ मनोरथ पुरवील ॥१६॥
आदित्याचीं सप्त नांवें ॥ घेवोनी त्यासी अर्ध्य द्यावें ॥ प्रथम आदित्य म्हणावें ॥ अर्ध्य अर्पन तुलांगी ॥१७॥
दुसरें भास्कर नाम घेऊन ॥ भानु हे तीसरें जाण ॥ रवी चवथें उत्तम ॥ ऐसें अर्ध्य अर्पावें ॥१८॥
सूर्यनारायण पांचवें ॥ दिवाकर हे सहावें ॥ प्रभाकर सातवें ॥ ऐसें सप्त अर्ध्य दिजे हो ॥१९॥
नंतर वस्तें घेऊनी ॥ कंचुकीकरावी परिधानी ॥ मग तिळाचें पिष्ट करुनी ॥ त्याची कोकिळा करावी ॥२०॥
षोडशोपचारें पुजिजे ॥ तेणे आपण सर्व पाविजे ॥ न्यून पडतां कैलासराजे ॥ न्यूज पदार्थ देतसे ॥२१॥
म्हणोनी शिवपूजेचे ठाई ॥ न्य़ून पदार्थ नसावा कांही ॥ परिपूर्ण असतां सर्वही ॥ पुरवील मनकामना ॥२२॥
अभिषेक करितां शिवासी ॥ संहार होईल पातकासी ॥ संपत्ति प्राप्त अहर्निशीं ॥ पुत्रपौत्रादि करोनी ॥२३॥
गंध अक्षता सुमनमाळा ॥ वाधतां संतुष्ट शंकरभोळा ॥ गुण उत्तम नानाकळा ॥ प्राप्त सौभाग्य अक्षयीं ॥२४॥
धूप जाळीतां उत्तमोत्तम ॥ अती सुवास होय परम ॥ दीप जाळीतां उत्तम ॥ वंशवृध्दि होय पैं ॥२५॥
पुत्र उत्तम बहुगुणी ॥ शिवभजन आवडे मनीं ॥ ऐसे दीपदानें करुनी ॥ कांति शरीरीं विशेष ॥२६॥
नैवेद्य शिवासी अर्पिता ॥ उभयलोंकी शिवभोक्ता ॥ भाग्य वर्धमान शंकरक्र्ता ॥ अक्षयीदेवी भक्ताने ॥२७॥
तांबुल देता शिवासी ॥ रिध्दीसिध्दी होय दासी ॥ नमस्कार करीत कैलासवासी ॥ काया आरोग्य करीरसे ॥२८॥
प्रदक्षणाक करितां जाण ॥ भ्रमहरे मनापासुनी ॥ श्रवण करितां महिमान ॥ महासिध्दी वोळंगती ॥२९॥
हवन करिता शिवप्रित्यर्थ ॥ कोशवृध्दी अत्यंत होत ॥ किर्तन करिता कैलासनाथ ॥ शिव पुढें उभा असे ॥३०॥
नृत्य करी सप्रेम ॥ तयास पुनर्जन्म ॥ ऐसा पूजन महिमा परम ॥ शोडशोपचारें अर्पावें ॥३१॥
ऐसे पूजन करावें ॥ ब्राह्मण अर्चन करावें ॥ तुळसीतें सेवावें ॥ वाचे वदावे हरिहर ॥३२॥
ऐसा नेम चालवितां ॥ भाग्याची नाही न्यूनता ॥ अंती कैलास सायुज्यता ॥ प्राप्त कुळासहित ॥३३॥
इति श्री महापुराणे ॥ ब्रह्मोत्तर खंडे ॥ कोकिलामहात्म्य ॥ द्वितियोऽध्याय गोडहा ॥३४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय दुसरा समाप्त ॥