मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (08:31 IST)

2022 मार्गशीर्ष गुरुवार खूप खास, हे उपाय केल्याने धनाचा वर्षाव होईल

Margshirsh guruvar 2022
मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते, ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं, ज्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं. अशात या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी.
 
यासोबतच तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर रांगोळी काढावी. याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
 
मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाची देवी वास करते.
 
देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. यासोबतच विष्णूजींना गूळ आणि हरभरा अर्पण करावा. याने दोघांचेही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव होईल.
 
या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
 
मार्गशीर्ष गुरुवारी गायीला गूळ, हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद मिळतो. एवढेच नाही तर या दिवशी गायीला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.
 
या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीप दान अवश्य करावे. याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होतात.