शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Physical Relation on Karwa Chauth करवा चौथच्या रात्री शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य?

Physical Relation on Karwa Chauth सनातन धर्माच्या व्रत परंपरेत करवा चौथ व्रताला विशेष महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात. करवा चौथला यथासांग पूजा आणि कथा केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि करवा मातेकडून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो, अशी पौराणिक श्रद्धा आहे. 
 
अशात विवाहित महिला अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी निर्जला व्रत पाळतात. मात्र करवा चौथ व्रताबद्दल अनेकांना उत्सुकता असते की करवा चौथच्या रात्री पतीसोबत संबंध ठेवता येतात का? शास्त्रीय समजुतींच्या आधारे या प्रश्नाचे योग्य उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
 
करवा चौथच्या रात्री शारीरिक संबध ठेवणे शुभ की अशुभ? याबद्दल ज्योतिष शास्त्र आणि धर्म शास्त्राच्या तज्ञांचे म्हणणे आहे की हे व्रत पती-पत्नीच्या शुभता याहून जुळलेला आहे. या व्रतामध्ये देवाची पूजा केली जाते. चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते. अशात करवा चौथ व्रताच्या रात्री पती-पत्नीला चुकुनही क्षणिक सुख देणारे हे कृत्य टाळावे. कारण असे केल्याने उपवासाच्या नियमांमध्ये अडथळे निर्माण होतात. अशात करवा चौथच्या दिवशी विवाहित महिलांनी आणि त्यांच्या पतींनीही व्रताचे नियम लक्षात ठेवून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे. 
 
अपत्यासाठी शास्त्रात विशेष नियम आणि तारखा सांगण्यात आल्या आहेत. अशात करवा चौथच्या दिवशी महिलांनी पूर्ण संयम बाळगावा. या दिवशी मनात चुकीचे विचारही येऊ नयेत.